VIDEO : गाडी नो पार्किंगला लाऊन पोलिसांशी हुज्जत, महिला SI ने कानशिलात लगावली
कर्नाटकात एक मुलगी नो पार्किंगमध्ये गाडी लावते. त्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांसोबत हुज्जत घालते (Karnataka women police slap girl over vehicle park in no parking area).
बंगळुरु : कर्नाटकाच्या मांडया शहरात एक तरुणी नो पार्किंगमध्ये गाडी लावते. त्यामुळे पोलीस तिथे कारवाई करण्यासाठी जातात. यावेळी तरुणी पोलिसांशी हुज्जत घालते. ती गाडीवरुन उतरत नाही आणि पोलिसांशी वाद घालते. यावेळी संतापलेली महिला पोलीस कर्मचारी तरुणीच्या कानशिलात लगावते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील होत आहे. ही घटना 7 मार्चला घडलीय (Karnataka women police slap girl over vehicle park in no parking area).
व्हिडीओत नेमकं काय?
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत मुलगी तिच्या स्कुटीवर बसली आहे. ती कुणालातरी फोन लावण्याचा प्रयत्न करतेय. तिच्या स्कुटीच्या आजूबाजूला पोलीस आहेत. नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याने ते तिची गाडी सील करण्याची कारवाई करताना दिसत आहेत. मात्र, मुलगी पोलिसांना या कारवाईला विरोध करताना दिसत आहे.
पोलिसांनी फाईन घ्यावी, अशी तिची भूमिका आहे. मात्र, पोलीस गाडी सील करण्याची कारवाई करताना दिसत आहे. यावरुनच मुलगी आणि पोलिसांमध्ये वाद होताना दिसत आहे. मुलगी हुज्जत घालत असल्याने एक महिला पोलीस कर्मचारी भडकली. महिला पोलीस कर्मचाऱ्याने मुलीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर मुलगी आणखी भडकते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झालाय.
मुलीजवळ हेल्मेट नाही
व्हिडीओत मुलीजवळ हेल्मेट दिसत नाही. याशिवाय घटनास्थळी दोन महिला पोलीस आणि त्यांच्यासोबत एका पुरुष पोलीस कर्मचारी दिसत आहे. दरम्यान, मुलगी अल्पवयीन आणि विद्यार्थिनी असल्याने पोलिसांनी तिला पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर पुढील कारवाई केली नाही (Karnataka women police slap girl over vehicle park in no parking area).
व्हिडीओ बघा :
कर्नाटक के मांडया में नो पार्किंग एरिया में स्कूटी खड़ी करने वाली लड़की की पुलिस के साथ बहस हो गई. इसी बीच एक महिला पुलिसकर्मी ने उसे तमाचा जड़ दिया और उस घटना का ये वीडियो खूब वायरल हो रहा है. हालांकि पुलिस ने बिना कार्रवाई किए लड़की को छोड़ दिया. #Karnatakapolice #mandya pic.twitter.com/GB2CTkOW6D
— Parvez Sagar (@itsparvezsagar) March 9, 2021
हेही वाचा : आधी छातीत चाकू खोपसून हत्या, मग गाड्यांनी चिरडलं, अपघात सांगून विम्याचे पैसे उकळणाऱ्या टोळीचा भांडाफोड