नवरा आणि त्याची गर्लफ्रेंड! दोघांनाही करवा चौथ च्या दिवशी पकडलं, सगळेच एका ठिकाणी शॉपिंगला…
या महिलेचा पती आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन करवा चौथच्या शॉपिंगला गेला. तिथेच ही महिलाही गेली होती.
बाजारात आईसोबत खरेदी करण्यासाठी आलेल्या पत्नीने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहिलं. यानंतर तिने आई आणि इतर बहिणींसह पती आणि प्रेयसीला जबर मारहाण केली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पतीला अटक केली, तर प्रेयसीला इशारा देऊन सोडून देण्यात आलं. हे कधी झालं करवा चौथ च्या दिवशी! या महिलेचा पती आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन करवा चौथच्या शॉपिंगला गेला. तिथेच ही महिलाही गेली होती, ती सुद्धा करवा चौथची शॉपिंग करायलाच गेली होती. तिला आपली पती आणि त्याची प्रेयसी दिसली आणि मग बाजारात एकच गोंधळ सुरु झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझियाबाद (गाझियाबाद) येथील सिहानी चुंगी भागातील कौशल नगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा विवाह प्रताप नावाच्या तरुणाशी 4 मार्च 2017 रोजी झाला होता.
काही दिवसानंतर या जोडप्यामध्ये वाद झाला, त्यानंतर पत्नी आपल्या माहेरी गेली आणि तिच्या कुटुंबीयांसोबत राहू लागली.
पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3 वर्षांपासून ती आपल्या मुलासोबत आपल्या माहेरी राहत आहे. तिने घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली तिने पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीने पोलिसांना सांगितले की, ती आपल्या आईसोबत तुराबनगर बाजारात खरेदी करण्यासाठी आली होती. तिने आपल्या नवऱ्याला आपल्या गर्लफ्रेंडसोबत बाजारात करवा चौथची (करवा चौथ 2022) खरेदी करताना पाहिलं.
त्याला पाहताच तिने आपल्या पतीला पकडले. यानंतर आई आणि बहिणींसोबत मिळून तिने पती आणि प्रेयसीला बेदम मारहाण केली.
गाजियाबाद तुराब नगर मार्केट में करवा चौथ पर प्रेमिका को शॉपिंग कराने आया था पति पीछे से पहुंची पत्नी ने बरसाई चप्पल!#Ghaziabad @Uppolice@JavedMustafa_ @Live_Gyan pic.twitter.com/WAauq6IKVy
— SURAJ KUMAR (@surajkumarmahak) October 13, 2022
ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पती आणि त्याच्या प्रेयसीला पोलीस ठाण्यात आणलं. तर पतीच्या प्रेयसीला इशारा देऊन सोडून देण्यात आले.
दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. लोकांनी मजेत कमेंट करताना म्हटलंय, करवा चौथच्या दिवशी घराबाहेर पडू नये आणि तो संपूर्ण दिवस फक्त पत्नीसाठी राखून ठेवावा.
दुसऱ्या एका युझरने म्हटले आहे की, गर्लफ्रेंडला खरेदीला घेऊन जाण्याआधी पतीने पत्नीच्या लोकेशनची माहिती घ्यायला हवी होती. प्लॅनिंग न करता गर्लफ्रेंड्सला भेटलं तर असंच होणार.