Video | धावत्या ट्रकला लागली आग, पण केरळच्या शाजीने वाचवला लोकांचा जीव, ‘खऱ्या हिरो’ने नेमकं काय केलं ?

व्हिडीओमध्ये दुर्घटना टाळण्यासाठी शाजी वर्गीस या माणसाने जीवाची बाजी लावली आहे. ट्रकमधील गवताने पेट घेतलेला असताना कशाचीही पर्वा न करता शाजी यांनी थेट ट्रकमध्ये जाऊन वस्तीमधून पेटत्या ट्रकला दूर मैदानात नेलं आहे. या घटनेला आठवडा उलटून गेला असला तरी त्याचा व्हिडीओ आता समोर आलाय.

Video | धावत्या ट्रकला लागली आग, पण केरळच्या शाजीने वाचवला लोकांचा जीव, 'खऱ्या हिरो'ने नेमकं काय केलं ?
KARNATAKA FIRE AND DRUNK
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 9:06 AM

बंगळुरु : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ (Viral Video) हे अतिशय थरारक असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हरखून जातो. सध्या मात्र केरळमधील (Kerala) एक व्हिडीओ सर्वांनाच थक्क करतोय. या व्हिडीओमध्ये दुर्घटना टाळण्यासाठी शाजी वर्गीस या माणसाने जीवाची बाजी लावली आहे. ट्रकमधील गवताने पेट (Fire) घेतलेला असताना कशाचीही पर्वा न करता शाजी यांनी थेट ट्रकमध्ये जाऊन वस्तीमधून पेटत्या ट्रकला दूर मैदानात नेलं आहे. या घटनेला आठवडा उलटून गेला असला तरी त्याचा व्हिडीओ आता समोर आलाय. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. नेटकरी या व्हिडीओला पाहून शाजी यांना हिरो म्हणत आहेत.

शाजी यांना चालवला पेटलेला ट्रक

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा ट्रक वायनाड येथून कोंडाचेरी या ठिकाणी जात होते. मात्र मध्येच कोझीकोड येथे आल्यानंतर ट्रकने अचानकपणे पटे घेतला. ही घटना लक्षात येताच ड्रायव्हरने ट्रक जागेवरच उभा करुन पळ काढला. तर दुसरीकडे ट्रकमधील गवाताने चांगलाच पेट घेतला होता. ही आग अशीच सुरु राहिली तर मोठा अनर्थ झाला असता. ट्रकचा स्फोट होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र ड्रायव्हरने पळ काढल्यानंतर घटनास्थळी शाजी यांची एन्ट्री झाली. ते एखाद्या हिरोप्रमाणे ट्रकमध्ये बसले. तसेच ट्रक सुरु करुन त्यांनी पेटता ट्रक चालवायला सुरुवात केली.

पाहा व्हिडीओ :

नेटकरी म्हणतायत शाजी खरा हिरो, व्हिडीओ व्हायरल

पेट घेतलेल्या ट्रकला चालवत त्यांना मोकळ्या मैदानात नेले. तसेच ट्रकला त्यांनी झिगझॅग पद्धतीने चालवले. ट्रक चालवण्याच्या या अनोख्या पद्धतीमुळे ट्रकवरील सर्व पेटलेले गवत खाली पडले. ज्यामुळे आग वाढली नाही. गवत खाली पडल्यामुळे आग पसरली नाही. शाजी थरारक पद्धतीने ट्रक चालवत असल्याचे दिसताच बाकीच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच खाली पडलेले गवत पाण्याच्या मदतीने विझवले. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक शाजी यांना खरा हिरो असल्याचं म्हणतायत. तसेच त्यांचे तोंडभरून कौतूक केले जातेय.

इतर बातम्या :

Viral : हर्ष गोयंकांनी विचारलं बॉन्डिंगसाठी काय चांगलं? अल्कोहल की फेविकॉल? फेविकॉलचं जबरदस्त उत्तरं वाचाच

Viral Video: सिंहाच्या पिंजऱ्यात घातला हात, पुढे जे घडलं ते बघून काळजचा ठोका चुकेल

Video | जगदीश खेबुडकरांचे बोल, आशा भोसलेंचा आवाज आणि रश्मिकाची कंबर! आहे की नाही खतरा कॉम्बिनेशन?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.