Navratri in Kabul Afghanistan: तालिबानच्या राज्यात ‘हरे रामा, हरे कृष्णा’चा डंका, नवरात्रीनिमित्त काबुलच्या मंदिरात किर्तन, जागरण आणि भंडारा

तालिबानच्या राज्यात पुन्हा एकदा सर्व कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र तरीही अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समुदायाने इथं कार्यक्रम केल्याची माहिती आहे. हिंदू समुदायाकडून मंगळवारी काबुलच्या असमाई मंदिरात (Asamai Mandir) हा कार्यक्रम करण्यात आला.

Navratri in Kabul Afghanistan: तालिबानच्या राज्यात 'हरे रामा, हरे कृष्णा'चा डंका, नवरात्रीनिमित्त काबुलच्या मंदिरात किर्तन, जागरण आणि भंडारा
हिंदू समुदायाकडून मंगळवारी काबुलच्या असमाई मंदिरात (Asamai Mandir) हा कार्यक्रम करण्यात आला
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 12:48 PM

काबुल: तालिबानचा ताबा मिळाल्यानंतर अफगाणिस्तानात पसरलेल्या भीतीचे वातावरण हळूहळू निवळायला सुरुवात झाली आहे. याचं ताजं उदाहरण राजधानी काबूलमध्येच पाहायला मिळालं. इथं नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर काबुलमध्ये (Navratri in Kabul Afghanistan) हिंदू नागरिकांनी कीर्तन आणि जागरण केलं. अफगाणिस्तानात सध्या तालिबानचं राज्य आलं आहे, तालिबानच्या राज्यात पुन्हा एकदा सर्व कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र तरीही अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समुदायाने इथं कार्यक्रम केल्याची माहिती आहे. हिंदू समुदायाकडून मंगळवारी काबुलच्या असमाई मंदिरात (Asamai Mandir) हा कार्यक्रम करण्यात आला. (Kirtan Bhajan at the Asmai Temple in Kabul, Afghanistan Taliban)

दरम्यान, अशरफ गनी सरकारमध्ये इथं सर्वकाही करण्यावर सूट होती. अमेरिकन सैन्य होतं, तोपर्यंत अल्पसंख्याक समुदायही अतिशय गुण्यागोविंदाने इथं राहात होता. अफगाणिस्तानात हिंदू आणि शिख अल्पसंख्यांक आहेत. मात्र, 15 ऑगस्टला जसं तालिबानने काबुलवर चढाई केली. गनी देश सोडून पळाले, तसे इथल्या अल्पसंख्यांक समुदायाचे दिवसही पालटले. मुस्लिमांप्रमाणेच हिंदूंवरही आता बंधनं घालण्यात आली आहे. मात्र, तरीही धर्मिक कार्यक्रम अजूनही सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इथल्या असमाई मंदिरात किर्तन, जागरणाचं आयोजन करण्यात आलं.

किर्तन जागरण आणि भंडाराही झाला

दरम्यान, अस्माई मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम शरण सिंह यांनी सांगितले की, नवरात्रीनिमित्त काबुलच्या असमाई मंदिरात किर्तन, जागरण तर झालंच, शिवाय भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात गरीब लोकांना अन्नदान करण्यात आलं. या कार्यक्रमात दीडशेच्या वर लोक जमले होते. ज्यात बहुतांश हिंदू आणि शीख नागरिक होते. तालिबानकडून या कार्यक्रमात कुठलाही व्यत्येय आला नाही.

व्हिडीओ पाहा:

भारत सरकारकडे हिंदू-शिख समुदायाची मागणी

सध्या अफगाणिस्तानातील वातावरण हे दुषित झालं आहे, बहुसंख्याक असलेले अफगाण नागरिकच इथं भीतीत जगत आहेत, ना नोकरी, ना अन्नधान्य अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे भारत सरकारने या नागरिकांची लवकरात लवकर अफगाणिस्तानातून सुटका करावी अशी मागणी करण्यात आली आहे. काबूलमधील हे असमाई मंदिर कर्ते परवन गुरुद्वाऱ्यापासून 5 किमीच्या अंतरावर आहे. गेल्या आठवड्यात याच गुरुद्वाऱ्यात संशयित तालिबानींनी तोडफोड केली होती.

हेही वाचा:

Video: महाकाय व्हेल बोटीजवळ आली, महिलेसोबत खेळली, बोटीला धक्काही दिला, वाढदिवसाच्या दिवशीच महिलेसोबत भर समुद्रात काय काय झालं?

Video: 2 कोल्ह्यांवर 1 मांजर भारी, मांजरीला यापुढे भित्री म्हणण्याआधी तिच्या धाडसाचा हा व्हिडीओ पाहा

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.