काळ्या कुत्र्यानं शेवटपर्यंत हार नाही मानली! बिबट्याला अखेर निराशच परतावं लागलं, पाहा Video

थरारक झटापटीत बिबट्यानं कुत्र्याच्या मानेवर हल्ला केला. आपल्या जबड्यात कुत्र्याची मान कसकन बिबट्यानं पकडली होती. बिबट्याची पकड इतकी जबरदस्त होती की बिबट्याच्या तावडीतून सुटण्यासाठी कुत्रा हा सर्वतोपरी प्रयत्न करत होता.

काळ्या कुत्र्यानं शेवटपर्यंत हार नाही मानली! बिबट्याला अखेर निराशच परतावं लागलं, पाहा Video
कुत्रा आणि बिबट्याची थरारक झटापट - Photo - Instagram
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 8:36 PM

कुत्र्याचा फडशा पाडणारे बिबटे (Leopard) तुम्ही अनेक पाहिले असतील. पण बिबट्याच्या तावडीतून एका कुत्र्यानं (Wild Dogs) स्वतःला आश्चर्य़कारकरीत्या वाचवलंय. ही थरारक आणि चकीत करणारी घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. बिबट्यानं आपल्या जबड्यात कुत्र्याची मान घट्टा शिकार करण्यासाठी पकडली होती. पण डेअरींगबाज कुत्र्यानं शेवटच्या श्वासापर्यंत हार मानली नाही. तो लढत राहिला. बिबट्यासमोर मोठ्या धीरानं आपल्या लढा दिला. पण अगदी मोक्याच्या क्षणी स्वतःची सुटका काळ्या कुत्र्यानं करुन घेतली आणि बिबट्याला अखेर निराशच माघारी परतावं लागलं. रात्री घडलेला हा सगळा थरारक प्रसंग टॉर्चच्या प्रकाशात टिपला आणि एकानं आपल्या मोबाईलध्ये ही घटना रेकॉर्ड केली आहे.

कुणी शेअर केला व्हिडीओ?

इन्स्टाग्रावरील एका युजरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. nature27_12नं शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 43 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून 4 हजारपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ आवडलाय.

नेमकं काय घडलं?

थरारक झटापटीत बिबट्यानं कुत्र्याच्या मानेवर हल्ला केला. आपल्या जबड्यात कुत्र्याची मान कसकन बिबट्यानं पकडली होती. बिबट्याची पकड इतकी जबरदस्त होती की बिबट्याच्या तावडीतून सुटण्यासाठी कुत्रा हा सर्वतोपरी प्रयत्न करत होता. पण बिबट्याच्या तावडीतून सुटणं तितकं सोपं नव्हतं. अखेर कुत्र्यानं आपली मान हलवण्याचा प्रयत्न सुरु केला. बिबट्याची पकड कमजोर करण्यासाठी कुत्रा आपलं संपूर्ण शरीर हरवू लागला. जीव वाचवण्यासाठी कुत्रा प्रयत्न करत होता. पण बिबट्याच्या जबरदस्त पकडेपुढे त्याचं एकही चालेना. अखेरीस बिबट्यानं चावा घेण्याच्या हेतून तोंड थोडं हलकं केलं. आणि तितक्यातच कुत्रा बिबट्याच्या जबडेतून सुटण्यासाठी पळाला.

अवघ्या काही क्षणांच्या आत बिबट्यानं कुत्र्याची शिकार गमावली. यानंतर बिबट्या एका दिशेला तर कुत्रा दुसऱ्या दिशेला सैरावैरा पळत सुटले आणि गायब झाले. हा सगळा थरारक प्रकार एका व्हिडीओत रेकॉर्ड झाला आहे. इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

पाहा व्हिडीओ –

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

संबंधित बातम्या :

जोरदार वाऱ्यानं वाळूला आला ‘असा’ आकार, सोशल मीडियावर Photos व्हायरल

Video : सेल्फी विकून झाला करोडपती! वाचा, इंडोनेशियन मुलाची यशोगाथा

‘अरे हा तर देवाचा अवतार!’ चार हात आणि चार पाय असलेल्या मुलाचा Photo Viral, कुठे घेतला जन्म?

Video | किचनमध्ये किंग कोब्रा घुसला, टेबलाखाली जाऊन फणा काढून लपला, बघा! कसा धरला?

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.