Video: आरे मेट्रो कारशेडच्या पत्र्याजवळ बिबट्याचं गोंडस पिल्लू, वनविभागाकडून पिल्लू रेस्क्यु, व्हिडीओ व्हायरल!

अगदी जिथं मेट्रोचं कारशेड होणार होतं, ज्या ठिकाणी कारशेडसाठी पत्रे टाकण्यात आले आहेत, अगदी तिथेच पावसाच हे बिबट्याचं पिल्लू बसलेले पाहायला मिळालं.

Video: आरे मेट्रो कारशेडच्या पत्र्याजवळ बिबट्याचं गोंडस पिल्लू, वनविभागाकडून पिल्लू रेस्क्यु, व्हिडीओ व्हायरल!
बिबट्याचं पिल्लू दिसल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ बोरिवली नॅशनल पार्कमधील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला.
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 11:21 AM

मुंबई: आरे कॉलनीत पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे, पण यावेळी मोठ्या बिबट्याचे नाही तर बिबट्याचं पिल्लू दिसलं आहे. अगदी जिथं मेट्रोचं कारशेड होणार होतं, ज्या ठिकाणी कारशेडसाठी पत्रे टाकण्यात आले आहेत, अगदी तिथेच पावसाच हे पिल्लू बसलेले पाहायला मिळालं. स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केली आहे. ( Leopard-cub-in-mumbai-aarey-rescued-in-blanket-Maharashtra Forest Department borivali national park )

बिबट्याचं पिल्लू दिसल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ बोरिवली नॅशनल पार्कमधील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. बिबट्याच्या पिलाची माहिती मिळताच, वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. तोपर्यंत घाबरलेलं हे पिल्लू तिथंच बसून होतं.

पाहा व्हिडीओ:

बिबट्याच्या पिल्लाला वाचवल्यानंतरचाही व्हिडीओ आता समोर आला आहे, जिथं एका शॉलमध्ये या पिल्लाला गुंडाळून रेस्क्यु सेंटरला नेलं जात आहे. हे पिल्लू आईपासून वेगळं झालं आणि त्यानंतर रस्ता चुकलेलं पिल्लू घाबरलं, आणि एका जागी बसलं असं वनविभागाचा अंदाज आहे.

पाहा व्हिडीओ:

@sohitmishra99 या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहण्यात आलं आहे की, माननीय देवेंद्र फडणवीसजी, ही आरेमधली तीच जागा आहे, जिथं तुम्ही कारशेड बनवण्याचा निर्णय घेतला होता. आज एक बिबट्याचं पिल्लू तिथून बाहेर येताना पाहायला मिळालं. आरेला आता जंगल घोषित करण्यात आलं आहे, मात्र कारशेडसाठी लावण्यात आलेले पत्रे अजूनही काढण्यात आलेले नाही. आशा आहे की हे लवकरच केलं जाईल. या युजरने आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.

मुंबईतलं आरेचं जंगल हे अतिशय दाट आणि प्राणीसंपदेने समृद्ध आहे. या भागात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि किटक सापडतात. जगातून संपण्याच्या मार्गावर असलेली रस्टी स्पॉटेड कॅट म्हणजे जगातील सर्वात लहान मांजरही इथं सापडते. बिबट्यांचा इथं मुक्तसंचार आहे. मात्र, फडणवीस सरकारमध्ये या जंगलात मेट्रो कारशेड तयार करण्याचा निर्णय झाला होता, हेच नाहीतर याचं कामही सुरु झालं. ज्याला पर्यावरणप्रेमींनी कडाडून विरोध केला. शिवसेनेनंही याला विरोध केला, मात्र, जेव्हा भाजपचं सरकार गेलं आणि मविआचं सरकार अस्तित्त्वात आलं, तेव्हा सप्टेंबर 2020 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने मेट्रो कारशेडचं काम थांबवलं आणि आरेला जंगल घोषित केलं.

हेही पाहा:

Video: स्प्लेंडरला बनवलं ट्रॅक्टर, नांगरलं सगळं शेत, पाहा शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड

मुंबई पोलिसांची बातच न्यारी ! बँड पथकानं सादर केलं ‘ऐ वतन तेरे लिए’ गाणं, व्हिडीओ व्हायरल

 

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.