खतरनाक! मुलीचा अफलातून स्टंट, नेटीझन्स विचारतायत अंगात हाडं आहेत की नाही?

जगात टॅलेंटेड मुलांची कमतरता नाही. अनेक टॅलेंटेड मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. यापैकी काही हटके व्हिडीओ आहेत, तर काही इतके कमाल आणि आश्चर्यकारक आहेत की त्यावरुन नजर हटत नाही.

खतरनाक! मुलीचा अफलातून स्टंट, नेटीझन्स विचारतायत अंगात हाडं आहेत की नाही?
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 5:54 PM

मुंबई : जगात टॅलेंटेड मुलांची कमतरता नाही. अनेक टॅलेंटेड मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. यापैकी काही हटके व्हिडीओ आहेत, तर काही इतके कमाल आणि आश्चर्यकारक आहेत की त्यावरुन नजर हटत नाही. गेल्या काही दिवसांपासून एका मुलीच्या जबरदस्त स्टंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येकजण म्हणेल की या मुलीचे शरीर आहे की रबर. रबरासारखी लवचिकता असलेली मुलगी आश्चर्यकारक स्टंट दाखवत आहे. व्हायरल झालेला हा स्टंट व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल. (Little girl amazing stunt on railing of bridge, video viral on social media)

व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी एका छोट्या रेलिंगवाल्या पुलावर जिम्नॅस्टसारखे स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका प्रशिक्षण सत्रादरम्यान काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मुलीच्या लवचिक शरीराकडे पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की हा स्टंट करण्यापूर्वी तिने किती सराव केला असेल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

aerialsochi ची नावाच्या अकाऊंटवरु हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो काही वेळातच व्हायरल झाला आहे. युजर्सकडून या व्हिडीओवर लाईक्सचा पाऊस सुरु आहे. आतापर्यंत 1800 हून अधिक युजर्सनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. मुलीच्या या आश्चर्यकारक स्टंट व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. काहीजण त्या मुलीला दुखापत होऊ शकते, अशी चिंता व्यक्त करत आहेत, तर कोणी म्हणत आहे की एवढ्या लहान वयात ही मुलगी एवढे अवघड स्टंट कशी करते?बहुतेक युजर्स मुलीच्या या प्रतिभेची प्रशंसा करत आहेत. एका युजरने तर या मुलीच्या शरीरात एकही हाड नसल्याचे म्हटले आहे.

इतर बातम्या

गाडीच्या छतावर स्वत:ला बांधलं, 180 किमीच्या वेगाने पळवली गाडी, VIDEO पाहून फुटेल घाम!

VIDEO : डीजेवाल्या नवरीचा नाद खुळा, भन्नाट गाण्यांवर वऱ्हाडींना नाचवलं

Viral Video : विश्वास, प्रेम आणि दयाळूपणा, पाहा श्वानाने कशा प्रकारे वाचवले माशांचे प्राण

(Little girl amazing stunt on railing of bridge, video viral on social media)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.