VIDEO: व्हेरी फनी! सहा व्हिलन एकत्र, घाबरलेल्या स्पायडरमॅनकडून देवाचा जप

SPIDER-MAN: NO WAY HOME चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर मिम्स आणि मजेशीर व्हीडिओ व्हायरल होत आहेत. यापैकी एक व्हीडिओ सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

VIDEO: व्हेरी फनी! सहा व्हिलन एकत्र, घाबरलेल्या स्पायडरमॅनकडून देवाचा जप
स्पायडरमॅन
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 11:46 AM

मुंबई: सध्या सोशल मीडियावर ‘स्पायडरमॅन नो वे होम’ (SPIDER-MAN: NO WAY HOME) या हॉलीवूडपटाची प्रचंड चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर दररोज अगणित मिम्स व्हायरल होत आहेत. SPIDER-MAN: NO WAY HOME या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. कारण, यामध्ये स्पायडरमॅन सिरीजच्या आतापर्यंतच्या सर्व भागांमधील व्हिलन्स एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटात स्पायडरमॅनची भूमिका साकारणारे टोबी मॅग्वायर, अँड्य्रू गारफिल्ड आणि टॉम हॉलंड हे तिन्ही नायकही एकत्र दिसणार आहेत. (Little Spiderman video goes viral on Social Media)

या व्हीडिओमध्ये काय?

SPIDER-MAN: NO WAY HOME चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर मिम्स आणि मजेशीर व्हीडिओ व्हायरल होत आहेत. यापैकी एक व्हीडिओ सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये स्पायडरमॅनचा पोशाख घातलेला एक लहान मुलगा देवघरासमोर लावेल्या समईपुढे बसून प्रार्थना म्हणताना दिसत आहे. आगामी चित्रपटात सहा खलनायक एकत्र येणार असल्याने स्पायडरमॅन घाबरून देवाचा धावा करत आहे, अशी कॅप्शन लिहून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. हा मजेशीर व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत. [By IG@memes_hostel] या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ नक्की कुठला आहे, हे अद्याप कळालेले नाही. मात्र, आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे. संबंधित बातम्या:

VIDEO: माझे दोन दातं तुटलं, मोबाईल पण गेला, आता आईपण मारेल; हा व्हायरल व्हीडिओ पाहिलात का?

VIRAL: पिवळी झालेली पँट घेऊन प्रवासी विमानतळावर उतरला, तपासणीनंतर समोर आलं धक्कादायक सत्य

VIDEO: हवेत तरंगणारा पिझ्झा, अंतरावीरांच्या फ्लोटिंग पिझ्झा पार्टीचा हा व्हीडिओ पाहिलात का?

(Little Spiderman video goes viral on Social Media)

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.