स्मार्ट बाई! अत्यंत शिताफीने चोरी, तंत्रज्ञानाने पकडलं
एका महिलेने अंदाजे 10 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा हार चोरल्याचे फुटेज समोर आले आहे.
चोराच्या चेहऱ्यावर मी चोर आहे असं कधी लिहिलेलं नसतं. काही जण खूप शिताफीने हात साफ करून जातात. काहीजण दिसायलाही इतके भोळे असतात की हा किंवा ही चोर आहे असा विचार सुद्धा आपल्या डोक्यात येत नाही. आता तंत्रज्ञानामुळे चोर सापडणं सोपं झालंय. कारण तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये सहज पकडला जातो आणि मग लवकरात लवकर चोराचा शोध घेतला जातो. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने सर्वांचीच तारांबळ उडवलीये. हे प्रकरण उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मधील आहे.
समीर अब्बास नावाच्या युजरने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एका महिलेने अंदाजे 10 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा हार चोरल्याचे फुटेज समोर आले आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हजारो युझर्स अचंबित झाले. दागिन्यांच्या दुकानात काळ्या रंगाचा चष्मा घालून आलेल्या महिलेवर कोणालाही संशय आला नाही आणि मग तिने तिच्या साडीच्या पदरात सोन्याचा हार लपवला.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा धक्कादायक प्रकार महिलेने दुकानदाराच्या डोळ्यासमोर केला. साडी नेसलेली एक वृद्ध महिला दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दागिने लपवताना कैद झाली. ही घटना 17 नोव्हेंबर रोजी घडली होती.
खरी ग्राहक असल्याच्या बहाण्याने ही महिला यूपीच्या गोरखपूरमधील एका शोरुममध्ये शिरली. इतर ग्राहकांप्रमाणे तीही आत जाऊन दुकानाच्या काऊंटरसमोर जाऊन बसते.
विक्रेता तिच्या मागणीनुसार तिला दागिने दाखवू लागतो. जोपर्यंत ती साडीखाली दागिना लपवत नाही तोपर्यंत ती इतर सोन्याच्या नेकलेसकडे पाहताना तिला काही न आवडण्याचा आव आणते. हे सगळं ती खूप शिताफीने करते.
गोरखपुर में काले चश्मे वाली महिला ने जूलरी शॉप में ऐसे पार किया सोने का हार pic.twitter.com/rqpzQGkw1n
— Samir Abbas (@TheSamirAbbas) November 26, 2022
यानंतर काळा चष्मा असलेली महिला काऊंटरवर ठेवलेल्या दागिन्यांमध्ये रस नसल्याचे भासवते आणि मग उठून उभी राहून निघून जाते.
शोरूममध्ये दुकानदार इतके व्यस्त होते की दुकानदारांना चोरी करणाऱ्या महिलेवर संशय आला नाही. दागिन्यांच्या गहाळ झालेल्या बॉक्सबद्दल कर्मचाऱ्यांना माहितीही नव्हती आणि ती महिला पळून जाण्यात यशस्वी झाली.