VIDEO : तुम्ही असं लग्न कधी बघितलंच नसेल, नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह, नवरा-नवरीसह नातेवाईकही पीपीई किटमध्ये
कोरोना संकटामुळे लग्न समारंभांवर मोठी संक्रांत आली आहे (Corona positive groom marriage in PPF kit viral video)
भोपाळ : कोरोना संकटामुळे लग्न समारंभांवर मोठी संक्रांत आली आहे. कोरोनामुळे अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात सध्या लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत लग्नाचं आयोजन करणं अवघड झालं आहे. मात्र, मध्य प्रदेशच्या रतलाम येथून एक वेगळी घटना समोर आली आहे. रतलाम येथे एका नवरदेवाचा लग्नाआधी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नवरदेव-नवरीसह नातेवाईकांनी पीपीई किट परिधान करुन लग्न पार पडलं. विशेष म्हणजे या लग्नाला प्रशासनाने देखील सहकार्य केलं (Corona positive groom marriage in PPF kit viral video).
लग्नाची तयारी पूर्ण झाल्यानंतर नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह
नवरदेवाची 19 एप्रिल रोजी कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्याआधीपासूनच लग्न ठरलं होतं. लग्नाची जवळपास सर्वच तयारी पूर्ण झाली होती. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने त्यांनी पीपीई किट परिधान करुन लग्न समारंभाचं आयोजन केलं. या लग्नाला अतिशय मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. याशिवाय सर्वांनीच पीपीई किट परिधान केलेलं होतं.
तहसीलदार कारवाईसाठी गेले, पण…
नवरदेव कोरोनाबाधित असूनही त्याचं लग्न आयोजित करण्यात आल्याची माहिती रतलामच्या तहसीलदारांना माहिती पडली. त्यांनी तातडीने कारवाई करण्याचं ठरवलं. ते फौजफाट्यासह लग्न आयोजित करण्यात आलेल्या मंदिरात गेले. पण तिथे त्यांनी बघितलं तर त्यांना समाधान वाटलं. कारण लग्नाला गर्दी नव्हती आणि सर्वांनी पीपीई किट घातलं होतं. त्यांनी लग्न अडवण्याचा प्रयत्न केला. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने हे लग्न पार पाडण्यास परवानगी मिळाली.
लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
लग्नानंतर नवरदेव-नवरीने आपली प्रतिक्रिया दिली. आम्हाला विश्वासच नव्हता की अशाप्रकारे आमचं लग्न होईल. आम्हाला खूप आनंद झालाय, अशी प्रतिक्रिया नवविवाहितांनी दिली. दरम्यान, या लग्नाचा व्हिडीओ परिसरातील नागरिकांनी सोशल मीडियावर शेअर केले. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. लोक व्हिडीओजवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत आणि शेअरही करत आहेत (Corona positive groom marriage in PPF kit viral video).
व्हिडीओ बघा :
#WATCH | Madhya Pradesh: A couple in Ratlam tied the knot wearing PPE kits as the groom is #COVID19 positive, yesterday. pic.twitter.com/mXlUK2baUh
— ANI (@ANI) April 26, 2021
हेही वाचा : Fact Check | लिंबू आणि बेकिंग सोडा मिश्रित गरम पाण्याने खरंच कोरोना विषाणू मरतो? जाणून या मागचं सत्य!