AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | टोयोटा फॉर्च्यूनरमध्ये बसून समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी, पण मध्येच लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं

एक माणूस समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी करत असताना त्याचा अपघात झालाय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | टोयोटा फॉर्च्यूनरमध्ये बसून समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी, पण मध्येच लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं
CAR STUNT AND ACCIDENT
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 11:09 PM
Share

मुंबई : आपल्या घरासमोर एखादी महागडी गाडी उभी असावी असे प्रत्येकालाच वाटते. काही लोक हे स्वप्न प्रत्यक्षात जगतातही. महागड्या गाड्यांवर स्टंटबाजी करणे तर तरुणांना जास्तच आवडते. ही स्टंटबाजी मात्र कधीकधी चांगलीच महागात पडते. असाच एक माणूस समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी करत असताना त्याचा अपघात झालाय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (man doing stunts with mahindra toyota car on sea beach got accident video went viral on social media)

माणसाची समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी

टोयोटा फॉर्च्यूनर या गाडीचे लोकांना चांगलेच आकर्षण आहे. ही कार ऑनरोड तसेच ऑफरोड अशा दोन्ही ठिकाणी धावते. याच कारणामुळे या कारचे सगळे चाहते आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील माणूस हीच कार चावलताना दिसतोय. कार चावलत असताना तो स्टंटबाजीसुद्धा करत आहे. तर कधी  मध्येच ब्रेक दाबतोय. कधी तर मध्येच समुद्राच्या लाटांजवळ कारला नेण्याचा प्रयत्न करतोय. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

लाट आल्यामुळे कारचा अपघात

स्टंट करताना मात्र या कारचालकासोबत भीषण घटना घडली आहे. कारचालक टोयोटा फॉर्च्यूनर कारमध्ये पॉवर स्लाइड करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि किनाऱ्यावरील वाळू यामुळे ही कार चांगलीच घसरली आहे. पुढे जागेवरच ही कार उलटल्याचे आपल्याला दिसत आहे. हा अपघात झाल्यानंतर समुद्र किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या बघ्यांनी कारकडे धाव घेतलीय. लोक कारचालकाला अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ नेटकरी उत्सुकतेना पाहत आहेत

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला नेटकरी उत्सूकतेने पाहत आहेत. काही लोक या व्हिडीओला शेअरही करत आहेत. या अपघातात कारचालकाला गंभीर दुखापत झालेली नाही.

इतर बातम्या :

Video | रस्त्यावर, पुलावर पाणीच पाणी, बसचे झाले जहाज, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

वय 63 वर्षे पण अजूनही तरुणच, आजीबाईंचा बहारदार डान्स एकदा पाहाच !

VIDEO: मुलाची मस्करी, तरुणी भिजली, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

(man doing stunts with mahindra toyota car on sea beach got accident video went viral on social media)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.