Video | पाण्याविना व्याकूळ झालेल्या उंटाला दिलं पाणी, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

या व्हिडीओमध्ये एका माणसाने उटांला पाणी दिले आहे. वाळवंटामध्ये तहान लागल्यामुळे व्याकूळ झालेल्या उंटाला एका माणसाने पाणी दिले आहे.

Video | पाण्याविना व्याकूळ झालेल्या उंटाला दिलं पाणी, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
CAMEL VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 4:48 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ तर चांगलेच व्हायरल होतात. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ काहीसा वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये तहान लागल्यामुळे व्याकूळ झालेल्या वाळवंटातील उंटाला एका माणसाने पाणी दिले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना अतिशय आनंद झाला आहे. (man gives water to thirsty camel sitting beside road video went viral on social media)

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा वाळवंटातील आहे. या वाळवंटात एक माणसू रस्त्यावर ट्रक घेऊन जात आहे. रस्त्याने चालत असताना या ट्रकचालकाला रस्त्याच्या कडेला एक उंट बसल्याचे दिसलेय. हा उंट पाहून ट्रकचालकाने आपली गाडी थांबवली आहे. तसेच त्याने ट्रकमधील पाण्याची बॉटल काढून उंटाकडे मार्गक्रमण केले आहे.

पाण्याविना वाळवंटात उंट व्याकूळ

थोड्या वेळानंतर व्हिडीओतील माणूस हा उंटाजवळ जाऊन पोहोचला आहे. कित्येक दिवस पाणी न पिल्यामुळे व्हिडीओतील उंट अशक्त होऊन पडल्याचे आपल्याला दिसतेय. त्यानंतर याच उंटाला व्हिडीओतील माणसाने पाणी दिले आहे. वाळवंटामध्ये पाण्याविना व्याकूळ झालेल्या उंटाला बॉटलमधील पाणी पाहून चांगलाच आनंद झाला आहे. माणसाने बॉटल समोर करताच उंटाने घाईघाईने पाणी प्यायला सुरुवात केली आहे.

पाहा व्हिडीओ :

माणसाचे नेटकऱ्यांकडूनन तोंडभरून कौतूक

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना या उंटावर दया आली आहे. लोकांनी उंटाला पाणी देणाऱ्या माणसाचे तोंडभरून कौतूक केले आहे. तसेच प्राण्यांची काळजी घ्यायला पाहिजे. सर्वांनी मुक्या प्राण्यांनी अन्न आणि पाणी दिले पाहिजे असे नेटकरी म्हणत आहेत. सध्या हा व्हिडीओ सगळीकडे चर्चेचा विषय ठरला असून नेटकरी त्याला सगळीकडे शेअर करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला आयएएस अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे.

इतर बातम्या :

Video | भर रस्त्यावर मृत्यूशी खेळ, तोंडात पेट्रोल टाकून आगीवर शिंपडण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

लहानपणीच वडील गेले, हौसेने लग्न करताना बोनेटवर बसली, आता व्हिडीओ व्हायरल करु नका, वधूमाय रडवेली

Video | केस धुताना महिलेची सारखी चुळबूळ, शेवटी हेअर स्टायलिस्टला राग अनावर, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

(man gives water to thirsty camel sitting beside road video went viral on social media)

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.