Video | उंच डोंगरावर कुत्र्याची मस्ती, एका चुकीमुळे मालकाला फुटला घाम, नेमकं काय घडलं ?

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा डोंगरावरुन खाली पडता-पडता वाचला आहे. त्याला वाचवताना एका माणसाला चांगलीच कसरत करावी लागलीय.

Video | उंच डोंगरावर कुत्र्याची मस्ती, एका चुकीमुळे मालकाला फुटला घाम, नेमकं काय घडलं ?
man-saves-dog
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 5:02 PM

मुंबई : प्राणी पाळण्याची सवय अनेकांना असते. काही लोक मांजर, कुत्रा असे प्राणी आवडीने पाळतात. एवढेच नाही तर काही लोकांना पाळलेले प्राणी आपल्या घरातील सदस्य असल्यासारखेच वाटते. मात्र, हेच प्राणी कधीकधी डोकेदुखी होऊन जातात. या प्राण्यांकडून कधी-कधी वेगळंच काहीतरी होऊन जातं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा डोंगरावरुन खाली पडता-पडता वाचला आहे. त्याला वाचवताना एका माणसाला चांगलीच कसरत करावी लागलीय. (man saves dog falling from cliff video went viral on social media)

माणूस कुत्र्याला डोंगरावर घेऊन गेला

घरात एखादा पाळीव प्राणी असला की वातावरण प्रसन्न राहते. काही लोक पाळीव प्राण्यांना पिकनिक, मॉर्निंग वॉकला सोबत घेऊन जातात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस कुत्र्याला डोंगरावर घेऊन गेला आहे. व्हिडीओमध्ये माणूस डोंगावर शांतपणे उभा आहे. निसर्गाचे सौंदर्य तो अनुभवत असून त्याच्या मागे कुत्रा खेळत आहे.

डोंगरावर कुत्र्याकडून एक चूक झाली 

मोकळ्या हवेत गेल्यामुळे कुत्रासुद्धा आनंदी झाला आहे. तो डोंगरावर हुंदडत आहेत. जमिनीवर लोळण घेत तो खेळत आहे. मात्र, खेळत असताना या कुत्र्याकडून एक मोठी चूक झालीय. हा कुत्रा खेळत असताना डोंगराच्या खाली घरंगळत गेलाय. तो डोंगराच्या बाजूला असलेल्या खोल दरीत कोसळत आहे.

कुत्र्याचे प्राण वाचवण्यात माणसाला यश

याच वेळी कुत्रा खाली पडत असताना बाजूला उभ्या असलेल्या माणसाची त्याच्याकडे नजर गेली आहे. माणसाने क्षणाचाही विलंब न करता कुत्र्याला काली पडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या प्रयत्नांत तो यशस्वी झाला आहे. शेवटी कुत्र्याचे प्राण वाचवल्यानंतर माणसाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. कुत्र्याच्या एका चुकीमुळे त्याच्या मालकाला चांगलाच घाम फुटला आहे.

इतर बातम्या :

Video | नावाला चिंपाझी पण काम माणसाचं, हवेत उडवतायत चक्क ड्रोन, व्हिडीओ व्हायरल !

VIDEO : ऐकावं ते नवलच! केसात साप बांधून महिला निघाली खरेदीला, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

Video: सपना चौधरीलाही टक्कर, घर घर की कहानी, हरीयानवी गाणे, देवर-भाभी दिवाने

(man saves dog falling from cliff video went viral on social media)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.