तोबा बिजली की रफ्तार! सरकारी बाबूंना काम करताना बघून सगळ्यांनाच बसला धक्का
सरकारी कार्यालयात एखाद्या कर्मचाऱ्याला वेगाने काम करताना तुम्ही क्वचितच पाहिलं असेल, पण आजकाल सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सरकारी कामे अतिशय संथ गतीने होतात, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. सरकारी बँकेत किंवा इतर कुठल्याही सरकारी कार्यालयात गेलात तरी इथल्या लोकांचं काम संथ गतीने बघून मन राग येतो. एखाद्या कागदपत्रावर नुसती स्वाक्षरी करायची असली तरी हे छोटंसं काम पूर्ण होण्यासाठी अनेक दिवस लागतात. सरकारी कार्यालयात एखाद्या कर्मचाऱ्याला वेगाने काम करताना तुम्ही क्वचितच पाहिलं असेल, पण आजकाल सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी विजेच्या वेगाने कागदपत्रांवर शिक्का मारताना दिसत आहे. सरकारी कार्यालयासारख्या दिसणाऱ्या कार्यालयात बसलेला एक कर्मचारी अत्यंत वेगाने कागदपत्रांवर शिक्का मारत असल्याचे या व्हिडिओत आपण पाहू शकता.
त्याचे दोन्ही हात जणू मशीन चालू असल्यासारखे हलत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सरकारी कार्यालयांमध्ये कासवांच्या गतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विसरून जाल. मात्र, हे सरकारी कार्यालयाचे दृश्य आहे की इतर कार्यालय किंवा इतक्या वेगाने काम करणारी ही व्यक्ती कोण आहे याबद्दल कोणतीही माहिती नाही.
झारखंडचे उपजिल्हाधिकारी संजय कुमार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘6G स्पीड…!!’ तो 6G स्पीडपेक्षा कमी नाही.
‘6G’ स्पीड…!! ? pic.twitter.com/sMZfX4pcqJ
— Sanjay Kumar, Dy. Collector (@dc_sanjay_jas) February 3, 2023
45 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 5 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘त्यांची कलात्मकता इंटरनेटच्या स्पीडपेक्षा जास्त आहे’, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “याला एक्सपीरियंस म्हणतात”.