अरेरे! पोस्ट व्हायरल झालीये खरी पण सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या भावनांचं काय?
याशिवाय काही लोक वर्तमानपत्रात याबाबत जाहिरातीही देतात. अशीच एक मॅट्रिमोनियल जाहिरात आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यावर लोक खूप एन्जॉय करतायत.
आज जगाने खूप हालचाल केली, प्रगती केली असली तरी भारतात आजही अरेंज मॅरेज मोठ्या प्रमाणावर आहेत. मुला-मुलीच्या कुटुंबीयांना आपल्या मुलांसाठी चांगला वर किंवा वधू शोधायची असते. तसेच अनेक वेळा नातेवाईकही या कामात गुंतून जातात आणि त्यांना योग्य वधू किंवा वर शोधण्यात मदत करतात. तसं पाहिलं तर आजकाल मुलगा किंवा मुलगी शोधण्याचं कामही ऑनलाइन केलं जातंय. याशिवाय काही लोक वर्तमानपत्रात याबाबत जाहिरातीही देतात. अशीच एक मॅट्रिमोनियल जाहिरात आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यावर लोक खूप एन्जॉय करतायत.
एक काळ असा होता की, सॉफ्टवेअर इंजिनीअर्स लग्नाच्या बाबतीत मुलींची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची पहिली पसंती असायची, कारण त्यांची कमाई तर चांगली होतेच, शिवाय त्यांना परदेशात जाण्याचीही चांगली संधी होती.
पण आज वर्तमानपत्रात दिलेली ही वैवाहिक जाहिरात पाहिली तर काळ बदलल्याचं जाणवतं. सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची मागणी आता पूर्वीइतकी राहिलेली नाही. हे वाचून सॉफ्टवेअर इंजिनीअरची काय हालत झाली असेल देव जाणे.
जाहिरात पहा
Future of IT does not look so sound. pic.twitter.com/YwCsiMbGq2
— Samir Arora (@Iamsamirarora) September 16, 2022
खरं तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर समीर अरोरा नावाच्या युझरने या मॅट्रिमोनियल जाहिरातीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात लिहिलं आहे की, बिझनेस बॅकग्राऊंडमधून असलेली एमबीए केलेली एक सुंदर मुलगी, वर शोधतेय. मुलगा आयएएस/आयपीएस, वर्किंग डॉक्टर (पीजी) किंवा त्याच जातीचा उद्योगपती/बिझनेसमन असावा.”
“सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना विनंती आहे की, कृपया फोन करू नका”. याचा अर्थ मुलीला सॉफ्टवेअर इंजिनीअर वर अजिबात नको असतो, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
ही मॅट्रिमोनियल जाहिरात ट्विटरवर खूप व्हायरल होत आहे, ज्यावर लोकही खूप एन्जॉय करत आहेत. एका युझरने कमेंट केली की, ‘आम्ही इंजिनिअर्स इतके वाईट आहोत का’, तर दुसऱ्या युझरने लिहिले, ‘आयटीशिवाय भविष्य चांगले असूच शकत नाही’.