53 लग्न केली! नेहमी “अशा” बायकोच्या शोधात असायचा
अबू यांनी सांगितलं की, त्याने वयाच्या 20 व्या वर्षी पहिल्यांदा त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या महिलेशी लग्न केले.या ५३ विवाहांमध्ये सगळ्यात कमी काळ टाकलेलं लग्न हे फक्त एका रात्री पुरतं होतं.
भारतात लग्नाला फार महत्त्व आहे. हिंदू धर्मानुसार लग्न म्हणजे सात जन्मांचं अतूट नातं असतं. अगदी ते सात जन्म टिकावं म्हणावं लोकं तर उपवास सुद्धा करतात. पण जगात बऱ्याच ठिकाणी अनेक विवाह केले जातात. भारतात सुद्धा आपण असे अनेक किस्से ऐकलेत ज्यात एक व्यक्ती 3-4 वेळा लग्न करतो. पण एक किस्सा सध्या खूप व्हायरल होतोय तो म्हणजे सौदीच्या एका व्यक्तीने चक्क 53 लग्न केलेत. आयुष्यात मानसिक शांती आणि स्थैर्य मिळवण्यासाठी या व्यक्तीने गेल्या 43 वर्षात 53 व्यांदा लग्न केलंय. आहे की नाही आश्चर्यकारक? इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, 63 वर्षीय अबू अब्दुल्ला यांनी आपण इतकी लग्न वैयक्तिक सुखासाठी नव्हे तर शांततेसाठी केली असल्याचं म्हटलंय.
अबू यांनी सांगितलं की, त्याने वयाच्या 20 व्या वर्षी पहिल्यांदा त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या महिलेशी लग्न केले.या ५३ विवाहांमध्ये सगळ्यात कमी काळ टाकलेलं लग्न हे फक्त एका रात्री पुरतं होतं.
अबू आपली पहिली पत्नी आणि मुलांसह आरामदायी जीवन जगत होता. पण तीन वर्षांनंतर अचानक असं काहीतरी झालं ज्यामुळे त्याने लगेच दुसरं लग्न ठरवलं. त्यानंतर वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी पुन्हा लग्न केलं.
अब्दुल्लाने गेल्या 43 वर्षांत त्याने 53 विवाह केले आहेत. परदेश दौऱ्यांच्या दरम्यान बायकोची कमी जाणवायची. त्यामुळे तो जिथे जिथे गेला त्याने लग्न केलं.
अब्दुल्ला म्हणतो की, “मी सर्वांना समान वागणूक दिली आहे आणि त्यांना समान अधिकार दिले आहेत.” केवळ शांतता आणि आरामासाठी आपण इतकी लग्न केली, असे अब्दुल्ला म्हणतात.
तो नेहमी अशा बायकोच्या शोधात असायचा, जी त्याला पूर्णपणे समजू शकेल, सांत्वन देईल आणि त्याला नेहमी आनंदी ठेवेल. या 53 लग्नांमध्ये त्यांनी बहुतांश सौदी महिलांना आपली वधू बनवले.