AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maut Ka Kuwa Viral Video: “मौत का कुआ!” स्टंट करता करता अचानक गाड्या कोसळल्या, व्हिडीओ व्हायरल!

Maut Ka kuwa Viral Video: प्रत्यक्षात मौत का कुआमध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन दुचाकी अचानक खाली जमिनीवर कोसळल्या आणि त्यानंतर जमिनीवर पडलेल्या दुचाकी स्वारांच्या अंगावर एक मारुती कारही कोसळली.

Maut Ka Kuwa Viral Video: मौत का कुआ! स्टंट करता करता अचानक गाड्या कोसळल्या, व्हिडीओ व्हायरल!
Maut Ka Kuwa Viral VideosImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 26, 2022 | 3:21 PM
Share

Maut Ka Kuwa Viral Video: बातमी आहे उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका जत्रेची. हा एका अपघाताचा व्हायरल व्हिडीओ आहे. अपघात आणि व्हिडीओ दोन्ही साधासुधा नाही. “मौत का कुआ” सारखे स्टंट (Maut Ka Kuwa Stunt)आपण लहानपणापासून जत्रेत बघत आलोय. त्याचाच हा व्हिडीओ! ‘मौत का कुआ’ स्टंटदरम्यान झालेल्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. प्रत्यक्षात मौत का कुआमध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन दुचाकी अचानक खाली जमिनीवर कोसळल्या आणि त्यानंतर जमिनीवर पडलेल्या दुचाकी (Two Wheeler) स्वारांच्या अंगावर एक मारुती कारही कोसळली. या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ कुणीतरी कॅमेऱ्यात कैद केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) होत आहे.

उरूस जत्रेदरम्यान ही घटना घडली

संपूर्ण प्रकरण अमरोहा जिल्ह्यातील उज्हरी शहरातील आहे, जिथे गेल्या अनेक दिवसांपासून उरूस जत्रेचे आयोजन केले जात आहे. या जत्रेतील मौत का कुआ मध्ये जबरदस्त अपघात झालाय. या अपघातात मौत का कुआ मध्ये स्टंटबाजी करणारे दोन बाइकस्वार अचानक दुचाकीसह जमिनीवर पडतात आणि मग त्यांच्या मागे धावणारी मारुती गाडीही बाइकस्वारांच्या अंगावर पडते. मौत का कुआ मध्ये अचानक झालेल्या या अपघातामुळे आजूबाजूला प्रचंड गोंधळ होतो.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले

या अपघातात दुचाकीस्वार दोघेही जखमी झाले असून, त्यांना आनंद-फनान येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मौत का कुआ मध्ये झालेल्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातानंतर व्हिडिओत लोकांच्या किंकाळ्या ऐकू येतात. इतकंच नाही तर जिथे डेथ स्टंटची विहीर सुरू होती, तिथे लोक इकडेतिकडे धावू लागले.6

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.