एका रात्रीत झाला मालामाल, 25 कोटी खात्यात आले, पण एक चूक अन् सारंच पाण्यात गेलं…
'द सन' या वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार, हा व्यक्ती ब्रिटनचा रहिवासी आहे. त्याचं नाव मायकल कारपेंटर आहे. नुकतंच त्याच्या खात्यात कोट्यावधी रूपये जमा झालेत. तो एका रात्रीत करोडपती झालाय.
मुंबई : आपल्याकडे खूप पैसा असावा, आपण करोडपती असावं, असं कुणाला नाही वाटत… पण हे स्वप्न फक्त स्वप्नच राहातं… कारण सर्वसामान्यांकडे एवढा पैसा येणं अशक्य गोष्ट आहे. पण अचानकपणे तुमच्या खात्यात 25 कोटी आले तर… हे खरं वाटणार नाही पणं असं घडलं आहे. ‘द सन’ या वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार, हा व्यक्ती ब्रिटनचा रहिवासी आहे. त्याचं नाव मायकल कारपेंटर (Michael Carpenter) आहे. नुकतंच त्याच्या खात्यात कोट्यावधी रूपये जमा झालेत. तो एका रात्रीत करोडपती (Millionaire) झालाय.
‘द सन’ या वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार, हा व्यक्ती ब्रिटनचा रहिवासी आहे. त्याचं नाव मायकल कारपेंटर आहे. नुकतंच त्याच्या खात्यात कोट्यावधी रूपये जमा झालेत. तो एका रात्रीत करोडपती झालाय. एके दिवशी सकाळी उठल्या उठल्या त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो कराडोपती झाला होता. मायकलने हारग्रीव्स लॅन्सडाउन या स्टॉक फर्ममध्ये 1 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली होती. त्याला त्याचा 2,200 टक्के परतावा मिळाला आणि त्याची रक्कम रात्रीत 25 कोटींहून अधिक झाली हे पाहून मायकेलला स्वत: लाही धक्का बसला.
मायकेलने याबाबत आपलं मत मांडलं आहे. त्याने म्हटंलय की, “सुरुवातीला मला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. खरंच हे सगळं माझ्या बाबतीत घडतंय का? की हे एक स्वप्न आहे, हे कळत नव्हतं.त्यामुळे मी अनेकदा माझं अकाऊंट चेक केलं. तेव्हा विश्वास बसला की खरोखरच माझ्या अकाउंटला 25 कोटी रुपये जमा झालेत. मला इतका आनंद झाला की मी आनंदाच्या भरात उड्या मारू लागलो. पण मला आजही विश्वास नाही बसत की माझ्याच सोबत हे सगळं घडलंय का?”
बरं या सगळ्यातला कळस म्हणजे या स्टॉक फर्मने या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मायकलने खात्री करण्यासाठी Hargreaves Lansdown फर्मला फोन केला. फर्मने तपासणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, एका चुकीमुळे हा सगळा घोळ निर्माण झाला आहे. त्यांनी सांगितलं की झाल्याने काही तांत्रिक त्रुटीमुळे ती रक्कम मायकलच्या खात्यात दिसत आहे. या स्टॉकशी संबंधित रक्कम ग्राहकांच्या खात्यात चुकीची दर्शवत होती, ती दुरुस्त करण्यात आली आहे, असं म्हणताच मायकलच्या आनंदावर विरझण पडलं. हे वास्तव समजल्यानंतर मायकेल निराश झाला.