Mumbai Airport Viral: विवाहीत माणूस गर्लफ्रेंडसोबत परदेशात फिरायला गेला, पॅनिक होऊन पासपोर्टची पानं फाडली, मग काय झाली अटक!

एक माणूस, लग्न झालेला माणूस आपल्या गर्लफ्रेंडला (Extra-Marital Affair) घेऊन सहलीला गेला बाहेरच्या देशात आणि पत्नीला शंका आल्याचं लक्षात येताच त्याने पॅनिक होऊन पासपोर्टची पानं फाडली.

Mumbai Airport Viral: विवाहीत माणूस गर्लफ्रेंडसोबत परदेशात फिरायला गेला, पॅनिक होऊन पासपोर्टची पानं फाडली, मग काय झाली अटक!
Mumbai Airport Viral newsImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 10:47 AM

मुंबई: आपल्या पासपोर्टशी (Passport) छेडछाड करणं, पाने फाडणं याची उत्तरं आपल्याला द्यावी लागतात ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत नसते. इतर कुठल्याही गाडीने आपण चोरून कुठे गेलो तर लपवाछपवी करणं सोप्प असतं कारण तिथे आपण तिकीट फाडू शकतो, लपवू शकतो. पण पासपोर्ट? पासपोर्ट च्या बाबतीत असं काहीच करता येत नाही. शेवटी तो देशाच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न आहे हा मुद्दा वेगळा. पण जर एखादा चोरून कुणाला भेटायला गेला तर तो ते लपवणार कसं? एक माणूस, लग्न झालेला माणूस आपल्या गर्लफ्रेंडला (Extra-Marital Affair) घेऊन सहलीला गेला बाहेरच्या देशात आणि पत्नीला शंका आल्याचं लक्षात येताच त्याने पॅनिक होऊन पासपोर्टची पानं फाडली. एअरपोर्टवर (Mumbai Airport) येताच झाला ना मग गुन्हा दाखल!

मुंबई विमानतळावरून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही व्यक्ती परदेश दौऱ्यावरून भारतात परतली तेव्हा मुंबई विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांना त्याच्या पासपोर्टची काही पाने गायब असल्याचे आढळून आले. या पानांवर त्याच्या ताज्या भेटीचा व्हिसा स्टॅम्प असायला हवा होता. खरं तर हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी परदेशात गेला होता आणि त्याला हे त्याच्या पत्नीपासून लपवून ठेवायचं होतं. आपला प्रवास लपवण्याच्या प्रयत्नात त्याने पासपोर्टच्या काही पानांशी छेडछाड केली.

पोलिसांनी केली अटक

या प्रकरणात निष्काळजीपणामुळे तो पोलिसांच्या अटकेचा बळी ठरला. त्या माणसाला हे कुठे माहीत होतं की, तो आपल्या बायकोच्या भीतीपोटी जे काही करतोय, ते त्याच्यासाठी एक समस्या बनणार आहे. पोलिसांनी याबाबत विचारलं असता, त्या व्यक्तीनं आपण पत्नीपासून आपले विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी पासपोर्टमध्ये छेडछाड केली होती असं सांगितलं.

गुन्ह्याबद्दल माहिती नव्हती

पोलिसांनी चौकशी केली असता त्या व्यक्तीने आपण कामानिमित्त भारतातच फिरणार असल्याचं पत्नीला सांगितलं होतं. पण तो जेव्हा खोटं सांगून परदेशात गर्लफ्रेंडसोबत सहलीला गेला तेव्हा पत्नीला संशय आला आणि तिने त्याला फोन करायला सुरुवात केली. घाबरून या इसमाने आपल्या पासपोर्टची पाने फाडली आणि एअरपोर्टवर आल्यावर अडचणीत सापडला. पासपोर्टशी छेडछाड करणे हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते हे पतीला माहित नव्हते.

या प्रकरणाचा तपास सुरू आहे

पतीचे वय 32 वर्षे असल्याचे सांगितले जाते. याबाबत माहिती देताना पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, फसवणूक आणि बनावटगिरीशी संबंधित भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली पतीला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.