मुंबईच्या झोपड्पट्टीतला व्हायरल फोटो बघून लोक म्हणाले, “क्या बात है”

जिथे लोकं झोपडपट्टीत राहतात. हे लोक दिवसरात्र काम करून मोठ्या शहरात दोन वेळचे जेवण कमावतात आणि आपलं कुटुंब चालवतात. बरं बाकी धावपळ एकीकडे आणि राहण्यासाठी जागा मिळाली तर वीज, पाणी अशा सुविधा नीट मिळत नाही ते एकीकडे. पण अशी लोकं कामावर समाधान मानून ते आपला उदरनिर्वाह करतात.

मुंबईच्या झोपड्पट्टीतला व्हायरल फोटो बघून लोक म्हणाले, क्या बात है
Mumbai cityImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 12:04 PM

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गगनचुंबी इमारती, आलिशान हॉटेल्सपर्यंत सर्व सुविधा आहेत. या शहराची चमक दिसून येते. सिनेमा, ग्लॅमरच्या दुनियेत करिअर करण्यासाठी अनेक जण इथे येतात. पण प्रत्येक शहराप्रमाणे मुंबईतही अशा अनेक वस्त्या आहेत, जिथे लोक छोटी घरे किंवा कमी सोयी-सुविधांसह राहतात. जिथे लोकं झोपडपट्टीत राहतात. हे लोक दिवसरात्र काम करून मोठ्या शहरात दोन वेळचे जेवण कमावतात आणि आपलं कुटुंब चालवतात. बरं बाकी धावपळ एकीकडे आणि राहण्यासाठी जागा मिळाली तर वीज, पाणी अशा सुविधा नीट मिळत नाही ते एकीकडे. पण अशी लोकं कामावर समाधान मानून ते आपला उदरनिर्वाह करतात.

पण सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही वाटेल की हे काय आहे. खरं तर मुंबईचं हवामान दमट आहे. आहे. इथल्या दमट उष्णतेला तोंड देणं सोपं नसतं. आता पैसे असलेल्या लोकांसाठी सर्व सुविधा आहेत. पण ज्यांना पाण्यासाठी सुद्धा रांगेत उभे राहावे लागते त्यांचे काय? होय, मुंबईतील झोपडपट्ट्या किंवा चाळींमध्ये राहणारे लोक प्रत्येक मूलभूत सुविधांसाठी दररोज धडपडत असतात. त्यांच्यासाठी घर, गाडी किंवा इतर महागड्या वस्तू एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नसतात. व्हायरल होत असलेला फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की चाळीतसुद्धा लोक अशी वस्तू खरेदी करू शकतात.

AC in slum area mumbai

AC in slum area mumbai

ट्विटरवर गब्बर (@GabbbarSingh) नावाच्या युजरने झोपडपट्टीत एका घरात लावलेल्या एसीचा फोटो पोस्ट केला. कॅप्शनमध्ये लिहिले आहे – उघड्या नाल्याच्या वर चाळ असलेल्या घरात एसी लावण्यात आला आहे. 10 जून रोजी शेअर केलेल्या या फोटोला 8 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 7 हजार लोकांनी त्याला लाईकही केलं आहे. याशिवाय युजर्स सातत्याने कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रियाही देत असतात. एकाने गमतीने लिहिले – माझा देश बदलत आहे. आणखी एकाने कमेंट केली- त्याच्याकडे एक कोटींची मालमत्ता आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.