Mumbai Local ची चर्चा एकीकडे, लेडीज डब्बा एकीकडे! हा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?
Mumbai Local ची चर्चा फक्त मुंबईत नाही जगात आहे. मुंबईची लोकल जगात भारी नाही का? गर्दीसाठी फेमस असणारी लोकल, तिची चर्चा एकीकडे आणि याच लोकलमधल्या लेडीज डब्ब्याची चर्चा एकीकडे. किती किस्से ऐकले तुम्ही लेडीज डब्ब्याचे? हा व्हिडीओ बघा, मुंबई लोकलचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय. व्हिडीओ लेडीज डब्ब्याचा आहे बरं का.
मुंबई: मुंबई लोकल ही मुंबई शहराची लाईफलाईन आहे. मुंबई लोकलचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक इथे रिल्स बनवतात, फॅशन करतात. कधी कधी विचार येतो मुंबईची लोकल नसती तर मुंबईचं काय झालं असतं? इतक्या मोठ्या शहराला लोकलनेच सांभाळून घेतलंय. बाहेरून येणारे लोक सुद्धा या लोकलला बघण्यासाठी येतात. आता सोशल मीडियावर रिल्सचे फॅड तर आहेच. इन्फ्लुएन्सर एक जागा सुद्धा सोडत नाहीत, सगळीकडे रिल्स बनवतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात मुली लोकलमध्ये चढतायत. हा लेडीज डब्बा आहे तरीदेखील इतकी गर्दी दिसून येतेय.
लेडीज डब्बा
मुंबई लोकल बद्दल आपण नेहमी एक गोष्ट ऐकतो इथे लेडीज डब्ब्यात सुद्धा जागा नसते. सगळ्या लोकलची चर्चा एकीकडे आणि लेडीज डब्याची चर्चा एकीकडे. लेडीज डब्बा ऐकून आपल्याला वाटतं तिथे जरा कमी गर्दी आणि शांतता असेल. पण मुंबई लोकलच्या लेडीज डब्ब्याची परिस्थिती उलट आहे. आता हा व्हिडीओच बघा, या व्हिडीओमध्ये लोकलचा लेडीज डब्बा दिसेल. एका स्थानकावर ही रेल्वे थांबलीये त्यात पटापट चढतायत. हा व्हिडीओ बघून तुम्हाला भीती वाटेल कारण ही रेल्वे पूर्ण थांबलेली देखील नाही तरीही बायकांची घाई सुरु आहे.
You’ll find this sad, scary, substandard living. But the affluent, wokes living comfortably in South Bombay glamorize this as the ‘spirit of Mumbai’, a ‘jhunjhuna’ given to the common Mumbaikars so that they feel better about their misery and don’t ask for better infrastructure. pic.twitter.com/3pARetar3A
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) September 16, 2023
“हीच आहे मुंबई!” नाही का?
मुंबईचं वेगवान आयुष्य, लोकलचा स्पीड आणि लोकांची घाई हे सगळं कसं जुळून येतं. लोकांनी इथे इतकी घाई असते की लोकल थांबते न थांबते तोवर ते पटापट चढू लागतात त्यांना प्रत्येकाला बसण्यासाठी जागा हवी असते. या व्हिडीओ मध्ये सुद्धा असंच काहीसं आहे. मुंबईची एक खूप महत्त्वाची बाजू या व्हिडिओमध्ये दिसून येते. हा व्हिडीओ बघा किती पटापट बायका लोकलमध्ये चढून जागा शोधतायत. हा व्हिडीओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघाल. असे व्हिडीओ याआधी सुद्धा व्हायरल झालेले आहेत. कधी हे व्हिडीओ स्लो स्पीड मध्ये करून पोस्ट केले जातात तर कधी फास्ट. यात लोकलमध्ये चढताना एक मुलगी खाली पडते पुन्हा उठते आणि पुन्हा पळू लागते, “हीच आहे मुंबई!” नाही का?