Video | ‘उद्धवा, बेटा एवढा सिंपल मुख्यमंत्री, वाटलं नव्हतं रे…’ सिंधुताईंचा जुना Video पुन्हा Viral
सिंधुताई यांच्यावर महिनाभरापूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली.
मुंबई : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं निधन (Sindhutai Sapkal Death) झालं. त्यांच्या निधनानं अनेकांवर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेद्र मोदींपासून (PM Narendra Modi) ते राज्याच्या मुख्यमंत्र्यासह (CM Uddhav Thackeray) अनेक मान्यवरांनी सिंधुताईंच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा सिंधुताई सपकाळ यांचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी झालेलं सिंधुताई सपकाळ यांचं संभाषण असलेला हा व्हिडीओ (Video) आता पुन्हा व्हायरल (Viral) झाला आहे.
Dr. Sindhutai Sapkal will be remembered for her noble service to society. Due to her efforts, many children could lead a better quality of life. She also did a lot of work among marginalised communities. Pained by her demise. Condolences to her family and admirers. Om Shanti. pic.twitter.com/nPhMtKOeZ4
— Narendra Modi (@narendramodi) January 4, 2022
काय आहे व्हिडीओमध्ये?
सिंधुताईन सपकाळ यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला होता. फोनवरुन साधलेल्या या संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुताईंचे आभार मानले होते. दरम्यान, सिंधुताईंनीही दिलखुलासपणे उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत केली होती. या कॉल रेकॉर्डिंगचा व्हिडीओ आता पुन्हा चर्चिला जातोय.
सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 4, 2022
मुख्यमंत्री कार्यालयातून सिंधुताईंना एक फोन करण्यात आला होता. यावेळी फोन कॉलदरम्यान, सिंधुताईंनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटलं होतं की, ‘एक सांगू बेटा उद्धवा, इतका सिंपका सिंपल मुख्यमंत्री पाहिला नाही. जराही बदल नाही तुझ्यात!’.
बाळासाहेबांचं रक्त!
उद्धव ठाकरेंची याची तारीफ करताना त्यांनी उद्धव ठाकरेंना शाबासकीदेखील दिली होती. उद्धवा, बेटा, तुझ्यात बाळासाहेबांचं रक्त आहे, असं म्हणत सिंधुताईंनी उद्धव ठाकरे यांची स्तुती केली होती. तू खंबीरपणे उभा राहिलास, लढलास, लेकरा तुझ्यात खरं बाळासाहेबांचं रक्त आहे. समर्थपणे तू पुढे चालला आहेस, असं यावेळी सिंधुताईंनी उद्धव यांना उद्देशून म्हटलं होतं. हा आपुलकीचा संवाद आता पुन्हा एकदा व्हायरल झालाय. या व्हिडीओचे वेगवेगळे भाग व्हॉट्सअप, फेसबुकवरुन शेअर केले जात आहेत.
वायरल मराठी नावाच्या एका युट्युब चॅनेलवर 9 एप्रिल, 2020 रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. दरम्यान, आता जवळपास दोन वर्षांनंतर सिंधुताईंच्या निधनानं हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
सिंधुताईंचं निधन
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं मंगळवारी पुण्यात दु:खद निधन (Passes Away) झालं. त्या 75 वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. सिंधुताई यांच्यावर महिनाभरापूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधुताई सपकाळ यांचं पार्थिव बुधवारी सकाळी 8 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता महानुभाव पंथानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नुकतंच सिंधुताईंना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ –
इतर बातम्या –
Sindhutai Sapkal Death | माई गेली आणि अवघा महाराष्ट्र पोरका झाला!
राज्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात 18 हजारापेक्षा अधिक रुग्ण, 20 जणांचा मृत्यू
Shocking | ‘बरं झालं तो मेला’ मुलाच्या मृत्यूनंतर असं कुणी म्हणतं? मग या आईनं का म्हटलं?