Optical Illusion | या चित्रात फूटबॉल शोधून दाखवा!
ऑप्टिकल इल्युजन खूप किचकट असतात. लहानपणापासून आपण कोडे सोडवत आलेलो आहे. ऑप्टिकल इल्युजन हा ऑनलाइन कोड्याचा प्रकार आहे. अभ्यासकांच्या मते ऑप्टिकल भ्रम व्यक्तीच्या स्वभावाबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात. ज्याला कुणाला याचं उत्तर लवकरात लवकर सापडतं तोच खरा हुशार म्हटला जातो
मुंबई: ऑप्टिकल इल्युजनची चित्रे खूप किचकट असतात. या चित्रांची उत्तरे शोधणे खूप कठीण असतं. लहानपणी आपण कोडी सोडवायचो ही कोडी आता ऑनलाइन आलेली आहेत. या कोड्यांना ऑप्टिकल भ्रम म्हणतात. याला भ्रम असं का म्हटलं जातं? भ्रम म्हटलं जातं कारण जेव्हा आपण सुरवातीला याचे चित्र बघतो तेव्हा जे आपल्याला दिसेल तेच वास्तव असेल असं नसतं. यात वास्तविकता काहीतरी वेगळीच असते. ऑप्टिकल इल्युजन सध्या सगळ्यात जास्त व्हायरल होणारा प्रकार आहे. यात विचारलेल्या प्रश्नाचं लगेच उत्तर द्यावं लागतं. ज्या व्यक्तीला लवकर उत्तर देता येईल तोच खरा हुशार मानला जातो. ऑप्टिकल इल्युजन त्याच व्यक्तीला सोपं वाटतं ज्याला या प्रकारची कोडी सोडवायचा सराव असेल.
फुटबॉल शोधा
असंच एक चित्र व्हायरल होतंय ज्यात तुम्हाला फूटबॉल शोधायचा आहे. तुम्हाला वाटेल इतकं सोपं उत्तर लगेचच सापडेल. पण वास्तविकता वेगळी आहे. फुटबॉल शोधायचा असेल तर त्यासाठी तुमचं निरीक्षण चांगलं असायला हवं. या चित्रात समुद्रकिनारी मौजमजा करणारी लोकं दिसतील. ही लोकं त्यांचा विकेंड घालवत असावीत. या दृश्यात तुम्हाला फुटबॉल शोधायचा आहे. मोजून दहा सेकंदात तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे.
उत्तर खाली देत आहोत
या चित्रात कुणी मस्त सन बाथ घेतंय, कुणी वॉटर गेम्स खेळायला तयार आहे तर कुणी नुसतंच निवांत पडून आहे. गोवा, कोकण मध्ये समुद्रकिनारा कसा पर्यटकांनी भरलेला असतो? तसाच हा समुद्रकिनारा आहे. आता इतक्या गर्दीत तुम्हाला शोधायचाय फुटबॉल! सोपंय? नाही ना? ऑप्टिकल इल्युजन अवघडच असतात. जरा नीट निरखून बघा, एकदम फास्ट डोळे चित्रावरून फिरवा. आता तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? किनाऱ्यावर इतक्या छत्र्या दिसतायत, एखाद्या छत्रीच्या खाली तर फूटबॉल नाहीये ना? आता तरी तुम्हाला याचं उत्तर दिसलं असावं. सापडलं असेल तर ठीक नसेल सापडलं तर काळजी करू नका आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.