शोधा म्हणजे सापडेल! या चित्रात मुंगी शोधा
Optical Illusion: एखादा कीटक असेल तर पटकन दिसून येत नसेल. म्हणून आपण काहीही खाताना ते आधी धुवून खातो. ऑप्टिकल इल्युजनचे असेच चित्र समोर आले आहे ज्यामध्ये एक मुंगी गोड ब्लूबेरी फळाच्या मधोमध बसलेली आहे.
मुंबई: कल्पना करा की एखाद्या गोड फळाच्या मधोमध एखादा कीटक आहे आणि तुम्ही ते फळ खात आहात. असे अनेक फळं असतात ज्यात एखादा कीटक असेल तर पटकन दिसून येत नसेल. म्हणून आपण काहीही खाताना ते आधी धुवून खातो. ऑप्टिकल इल्युजनचे असेच चित्र समोर आले आहे ज्यामध्ये एक मुंगी गोड ब्लूबेरी फळाच्या मधोमध बसलेली आहे.
खरं तर नुकताच हा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे, यात तुम्हाला लपलेली मुंगी शोधायची आहे. मुंगीचा रंग आणि ब्लूबेरीचा रंग सारखाच दिसत असल्याने कदाचित त्यामुळेच मुंगी लगेच दिसत नाही.
या फोटोसाठी सोशल मीडिया युजर्सना 10 सेकंदाचं चॅलेंज देण्यात आलं आहे. एवढ्या वेळात जर तुम्हाला ही मुंगी सापडली तर तुम्हाला खरोखरच जीनियस म्हटलं जाईल. एक गोष्ट म्हणजे हे चित्र जितकं सोपं दिसतं, तितकंच त्यातली मुंगी शोधणंही अवघड आहे. आता मन लावून उत्तर शोधा.
जर तुम्हाला या चित्रातील मुंगी सापडली नसेल तर आम्ही तुम्हाला याचे उत्तर सांगतो. चित्र नीट पाहिलं तर डाव्या बाजूला खालून वर जाताना चौथ्या रांगेत पहिल्या फुलाच्या उजव्या बाजूला एक मुंगी बसलेली असते. ही मुंगी दिसणार नाही अशा पद्धतीने सेट केलेली आहे. पण नीट पाहिलं तर मुंगी दिसते.