Viral: अय एकच नंबर! दोस्तो हमारी भेलपुरी अब फेमस होगयीं, ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध मास्टरशेफमध्ये चर्चा…

साराने तिच्या इन्स्टाग्रामवर तिची संपूर्ण स्टोरी शेअर केली आहे. या शोमधील तिचे फोटो शेअर करत तिने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, जजेसने तिला 10 मिनिटात एक स्वादिष्ट पदार्थ बनवण्यास सांगितले आणि तिच्या मनात पहिले नाव आले ते भेळ पुरीचे.

Viral: अय एकच नंबर! दोस्तो हमारी भेलपुरी अब फेमस होगयीं, ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध मास्टरशेफमध्ये चर्चा...
भारताची भेळपुरी ऑस्ट्रेलियाच्या मास्टरशेफमध्ये Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 11:30 AM

तिखट, चटपटीत भेळ पुरी (Bhel Puri) साठी प्रत्येक भारतीयाच्या मनात एक कोपरा असतो. प्रत्येक भारतीयासाठी हा मुख्य आणि आवडतं स्नॅक्स आहे यात शंका नाही. हे बनवायला सोप्पं, कुरकुरीत आणि त्यात सगळेच चांगले पदार्थ असल्यामुळे ते निरोगी असतं. हा पदार्थ वेळ वाचवतो आणि झटपट बनवून झालं की खाऊन पोट देखील भरलं जातं, भूक शांत होते! पण, तुम्हाला माहीत आहे का की,आपले स्ट्रीट फूड हे मास्टरशेफ लेव्हलचे पदार्थ बनले आहेत. होय, हे खरंय की, प्रसिद्ध शो ऑस्ट्रेलियन मास्टरशेफ (MasterChef Australia) च्या परीक्षकांना आपलं हे स्ट्रीट फूड (Indian Street Food) आवडलंय. परीक्षकांनी या पदार्थाचं तोंड भरून कौतुक केलंय. मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाची स्पर्धक सारा टॉड हिने या शोमध्ये भेळ पुरीला स्नॅक्स म्हणून बनवल्यानंतर भेळ पुरी ट्विटरवर चर्चेचा विषय बनली आहे. या स्पर्धकाने एक अतिशय कॉमन इंडियन डिश बनवली आणि त्यातील प्रत्येक घासात भरपूर फ्लेवर्स असल्याने ते खाल्ल्याने परीक्षकांना धक्काच बसलाय.

सेलिब्रिटी शेफ सारा

एक भारतीय ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी शेफ साराने या शोमध्ये ही डिश बनवली. शोच्या या 16 व्या सीझनमध्ये सारा काही भारतीय पाककृतींनी परीक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करतीये. साराने तिच्या इन्स्टाग्रामवर तिची संपूर्ण स्टोरी शेअर केली आहे. या शोमधील तिचे फोटो शेअर करत तिने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, जजेसने तिला 10 मिनिटात एक स्वादिष्ट पदार्थ बनवण्यास सांगितले आणि तिच्या मनात पहिले नाव आले ते भेळ पुरीचे.

हे सुद्धा वाचा

ऑस्ट्रेलियासाठी हे कठीण आहे

भेलपुरी किती सहज तयार करता येते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पण परीक्षक आणि ऑस्ट्रेलियन लोकांसाठी ही एक गुंतागुंतीची डिश होती. साराने तिची कहाणी शेअर केल्यानंतर, न्यायाधीशांच्या प्रतिक्रिया आणि मास्टरशेफमधील भेळ पुरी पाहिल्यानंतर देसी इंटरनेटवर व्हायरल झाला. काहींनी तयारीच्या वेळेची खिल्ली उडवली, भारतीय बेल पुरी विक्रेता 1 मिनिटात तयार करून देतो, असे सांगितले, तर काहींनी सांगितले की ते दररोज संध्याकाळी फक्त 20 रुपयांत मास्टरशेफ लेव्हलची डिश बनवत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.