पाकिस्तानचे नवे चांद नवाब! व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

अब्दुल रहमान खान यांच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युजरने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गंमत करत लिहिलं, 'पाकिस्तानी पत्रकारांमध्ये कमालीची प्रतिभा आहे.

पाकिस्तानचे नवे चांद नवाब! व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?
Pakistan reporter
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 4:44 PM

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या कराचीमधून व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या मजेशीर रिपोर्टिंगने लोकांना हसवलंय. या विचित्र मजकुरामुळे पाकिस्तानी रिपोर्टरने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक मध्यमवयीन व्यक्ती ‘लाइव्ह रिपोर्टिंग’ या संकल्पनेला एका नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हवामानाची माहिती देताना तो रिपोर्टर अशा गोष्टी करतो की, प्रेक्षक बघून थक्क होतात. रिपोर्टिंग करताना उत्साह इतका जास्त असतो की, काय योग्य आणि काय अयोग्य हेच कळत नाही.

व्हायरल क्लिपमध्ये अब्दुल रेहमान खान नावाचा एक रिपोर्टर समुद्र किनाऱ्यावर रिपोर्टिंग करत आहे. हवामानाची माहिती देण्याचे काम तो एकदम मजेशीर रित्या करत आहे. समुद्र किती खोल आहे, वातावरण कसं आहे तो ते मजेशीर आणि अतिरंजित पद्धतीने इथे सांगतोय. खरं आश्चर्य म्हणजे जेव्हा तो न डगमगता आपला मायक्रोफोन धरून समुद्रात उडी मारतो आणि मग पोहताना आपलं रिपोर्टींग चालू ठेवतो. पाण्याच्या आत जाऊन तो ते पाणी किती खोल आहे हे सांगतो.

रिपोर्टर आपला कॅमेरामन तैमूर खानसोबत घाईघाईत रिपोर्टिंग संपवतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अशीच एक घटना पाकिस्तानी टीव्ही रिपोर्टर चांद नवाब यांनी 2008 मध्ये केली होती, ज्याचा एक व्हिडिओ आजही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अब्दुल रहमान खान यांच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युजरने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गंमत करत लिहिलं, ‘पाकिस्तानी पत्रकारांमध्ये कमालीची प्रतिभा आहे.

'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.