VIDEO : आधी गुडघा टेकला, मग पुष्पगुच्छ, नंतर अश्रूंचा बांध फुटला, तरुणीच्या प्रपोजचा व्हिडीओ होतोय व्हायरल

जगभरातील लाखो, कोट्यवधी लोकं वेगवेगळ्या पद्धतीने आपलं प्रेम व्यक्त करत असतात (Pakistani girl propose her boyfriend viral video).

VIDEO : आधी गुडघा टेकला, मग पुष्पगुच्छ, नंतर अश्रूंचा बांध फुटला, तरुणीच्या प्रपोजचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 2:46 PM

लाहौर (पाकिस्तान) : जगभरातील लाखो, कोट्यवधी लोकं वेगवेगळ्या पद्धतीने आपलं प्रेम व्यक्त करत असतात. आपल्या जोडीदारापुढे प्रेम व्यक्त करतानाचा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असावा, अशी काहींची इच्छा असते. त्यामुळे ते जगावेगळ्या पद्धती अवलंबतात. आतादेखील अशाच एका कपलचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत मुलगी आपल्या जोडीदारासमोर प्रेम व्यक्त करताना दिसत आहे (Pakistani girl propose her boyfriend viral video).

व्हिडीओत रोमॅन्टिक वातावरण

सर्वसामान्यपणे मुलगा जमिनीवर गुडघा टेकून मुलीला प्रपोज करतानाचा व्हिडीओ आपण बघितलाय. अनेक चित्रपटांमध्येही आपण तसंच बघितलंय. मात्र, आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत चक्क मुलगी जमिनीवर गुडघा टेकून प्रेम व्यक्त करत आहे. तो क्षण, ते वातावरण आणि त्या वातावरणाचे साक्षीदार असलेल्या लोकांची दाद, हे सर्व दैदीप्यमान असं वातावरण व्हिडीओत दिसत आहे.

संबंधित व्हिडीओ हा पाकिस्तानमधील असल्याची माहिती समोर आली आहे. ते कपल नेमकं कोण आहे त्याची माहिती मिळाली नाही पण तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘uol_inside’ नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलाय (Pakistani girl propose her boyfriend viral video).

व्हिडीओत नेमकं काय घडतं?

व्हिडीओत एका टेबलवर फुलांच्या पाकळ्या दिसत आहेत. एक मुलगी हातात पुष्पगुच्छ घेऊन जमिनीवर गुडघा ठेवते. तिच्यासमोर काळ्या शर्टात एक सुंदर मुलगा उभा आहे. ती त्या मुलाला जमिनीवर गुडघं टेकून प्रमोज करते. त्याच्याप्रती प्रेम व्यक्त करते आणि त्याच्या हातात पुष्पगुच्छ देते. मुलगा तिच्या प्रपोजचा स्वीकार करतो आणि मुलीच्या हातातून पुष्पगुच्छ घेतो. त्यानंतर दोघं मिठी मारतात. यावेळी मुलीच्या डोळ्यांमधून अश्रू येतात. तर मुलगा गोड स्मितहास्त देत तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे त्यांच्या आजूबाजूला काही तरुण मोबाईलवर त्यांचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत. मुलाने मुलीचा प्रपोज स्वीकारल्यानंतर ते आनंदाने ओरडायला लागतात.

पाहा व्हिडीओ :

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम हा फार सॉफ्ट कॉर्नर आहे. प्रेमात असलेली व्यक्ती प्रचंड संवेदनशील असते. प्रेम जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये असतं आणि समोरच्या जोडीदारापुढे व्यक्त करायचं असेल तर तो क्षण आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी काहीतरी वेगळं करावं, अशी भावना अनेकांच्या मनात येते. त्यामुळे सध्या तरुण अशा वेगवेगळ्या पद्धतीत एकमेकांना प्रपोज करतात.

हेही वाचा : नवरा बायको रोजच्या भांडणाला कंटाळले, बघा त्यांनी त्यावरचा मार्ग काय काढला?

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.