Pandharpur Wari 2022: गोजिरवाणे रुप तुझे मला ही सावरू दे, बोला विठ्ठल विठ्ठल! या…वारीतले छान फोटोज बघू

Pandharpur Wari 2022: विठ्ठलाच्या भक्तीत रमलेला भक्त, पायी चालत जाणारे वारकरी, दमलेला थकलेला पण तरीही त्या माऊलीचा तो प्रसन्न चेहरा! यापेक्षा चांगला विषय फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी असूच शकत नाही.

Pandharpur Wari 2022: गोजिरवाणे रुप तुझे मला ही सावरू दे, बोला विठ्ठल विठ्ठल! या...वारीतले छान फोटोज बघू
Pandharpur Wari 2022Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 10:09 AM

Pandharpur Wari 2022: दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ, मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात, त्यामुळे या वारीचा विशिष्ट अनुभव असतो. यावर्षी तब्बल 2 वर्षांनी पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) पार पडतीये. वारीत माऊलींची गर्दीच गर्दी पाहायला मिळतीये. यंदा 10 जुलैला पार पडणार्‍या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी 20 जूनला देहू मधून संत तुकाराम महाराजांची आणि 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघाली. यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. वारी करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. विठ्ठलाची (Vitthal) वारी हा फोटोग्राफर्ससाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. विठ्ठलाच्या भक्तीत रमलेला भक्त, पायी चालत जाणारे वारकरी, दमलेला थकलेला पण तरीही त्या माऊलीचा तो प्रसन्न चेहरा! यापेक्षा चांगला विषय फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी असूच शकत नाही. वारीच्या काळात अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. आपण जरी वारीत सहभागी नसलात तरी या पोस्ट्स बघून आपल्यालाही वारीत (Wari2022) सहभागी झाल्यासारखंच वाटेल…

बोला विठ्ठल विठ्ठल !

– व्हिडीओग्राफर @haram_khor_ गणेश वानरे

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Ganesh Vanare (@haram_khor_)

तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा ॥ बहुता सुकृताची जोडी । म्हणुनी विठ्ठलीं आवडी ॥

– व्हिडीओग्राफर @haram_khor_ गणेश वानरे

View this post on Instagram

A post shared by Ganesh Vanare (@haram_khor_)

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥

– व्हिडीओग्राफर @haram_khor_ गणेश वानरे

View this post on Instagram

A post shared by Ganesh Vanare (@haram_khor_)

माझा विठ्ठल माझी वारी!

– फोटोग्राफर @roshgulla रोशनी शाह

गोजिरवाणे रुप तूझे मला ही सावरू दे

– फोटोग्राफर @kaam_dhanda रितीक सरवदे

View this post on Instagram

A post shared by ritik sarvade (@kaam_dhanda)

(बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. हे फोटोज व्हिडिओज वेगवेगळ्या फोटोग्राफर्स काढलेले आहेत. आवडले तर त्यांना फॉलो करा.)

' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.