“आयुष्य नेमकं कुणाचं सोपं आहे?” हा व्हिडीओ बघून प्रश्न पडतो
आजकाल सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो अत्यंत हृदयद्रावक आहे.
जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या आयुष्यातील समस्यांचे ओझे घेऊन फिरतात आणि नेहमी विचार करतात की त्यांच्या अडचणी कायमच्या संपल्या पाहिजेत. भगवान श्रीकृष्णांनीही जीवन म्हणजे संघर्ष आहे, असे म्हटले आहे. तुम्ही कोणीही असलात, या जगात आला असाल तर तुमच्या आयुष्यात नेहमीच संघर्ष असेल. स्वतः देवही मानवी जीवनात पृथ्वीवर आला तर तो आव्हानांपासून वाचू शकत नाही. मात्र, काही लोकांच्या आयुष्यात खूप संघर्ष असतो, तो पाहून कधी कधी दुसऱ्यांचेही डोळे पाणावतात. आजकाल सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो अत्यंत हृदयद्रावक आहे.
खरंतर या व्हिडीओमध्ये दोन लहान मुली रस्त्याच्या कडेला स्टंट दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या वेळात तिथून लोक ये-जा करत होते, पण त्यांना कुणीही पैसे द्यायला तयार नव्हतं. त्यांना कुणीही मदत करायला तयार नाही. थोड्या वेळाने ढोलकी वाजवणाऱ्या मुलीच्या डोळ्यातही अश्रू येतात.
ती रडू लागते, पण मग तिला समजतं की रडण्याने आपलं आयुष्य सोपं होणार नाही, म्हणून ती पुन्हा एकदा रडत रडत ढोलकी वाजवू लागते, तर तिची बहीण रस्त्याच्या दुतर्फा परफॉर्म करत असते. हा व्हिडिओ प्रचंड भावुक करणारा आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Gulzar_sahab नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे, ज्यांना फक्त असे वाटते की त्यांच्या आयुष्यात समस्या आहेत’.
24 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 80 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर 4 हजाराहून अधिक लोकांनीही हा व्हिडिओ लाईक केला आहे.
ये वीडियो उनके लिए जो सिर्फ सोचते हैं कि उनके ही ज़िन्दगी में परेशानियां हैं ?? pic.twitter.com/M1FXGoDTgp
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) December 10, 2022
त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहून विविध कमेंट्सही केल्या आहेत. एका युझरने भावनिकरित्या लिहिलं, ‘काश असं काही झालं नसतं तर…’
दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘कधीही कमजोर होऊ नकोस बेटा, प्रत्येक वाईट वेळेला सामोरं जा, देव तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकेल, हीच माझी प्रार्थना आहे’.