ए भाई ए…कुठे? कबुतराची टशन बघा, विमानावर बसलं, विमान उडालं तरी उडायचं नाव घेईना…त्यानंतर
नुकतंच एक कबुतर विमानाच्या पंखावर बसलेलं असतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. विशेष म्हणजे विमानाने उड्डाण घेतल्यानंतरही तो हलला नाही.
काही दिवसांपूर्वी भारतात एका विमानात एक कबुतर शिरलं आणि ते काढण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला असा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. नुकतंच एक कबुतर विमानाच्या पंखावर बसलेलं असतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. विशेष म्हणजे विमानाने उड्डाण घेतल्यानंतरही तो हलला नाही. अखेर विमान एका उंचीवर गेल्यावर ते घसरून खाली पडलं.
याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तिथे हे कबुतर कसं बसलेलं होतं, हे व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. यानंतर विमान वेगाने धावू लागलं,त्यानंतरही तिथून हलले नाही. अखेर विमानाचा वेग वाढल्यावर ते किंचित हादरलं पण तरीही हलले नाही. विमान उंचीच्या दिशेने जाऊ लागल्यावर ते कबुतर घसरून पडले.
या घटनेचा संपूर्ण क्रम विमानाच्या आत बसलेल्या प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. मात्र, कबुतर घसरून खाली पडल्यावर त्यानंतर प्रवाशाला व्हिडिओ रेकॉर्ड करता आला नाही.
हा व्हिडिओ पोस्ट होताच तो व्हायरल झाला. त्यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. कबुतराने खूप हिंमत दाखवली, असे काही जण म्हणत आहेत.
याआधी विमानात कबुतर घुसल्याची घटनाही समोर आली आहे. जयपूरला येणाऱ्या विमानात उड्डाणापूर्वीच एक कबुतर सापडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली असतानाचा हा व्हिडीओ आहे.
यानंतर विमान थांबवून पहिले कबुतर बाहेर काढण्यात आले, त्यानंतर अहमदाबादहून जयपूरला जाण्यासाठी विमानाला यश आले. सध्या कबुतराचा हा नवा व्हिडिओ व्हायरल होतोय.