हे विमान हवेत एकाच ठिकाणी थांबलंय! हो! व्हिडीओ बघा…
विमान ओव्हरब्रिजच्या वर हवेत एक 'स्टॅच्यू' बनून आहे. आता ही डोळ्यांची फसवणूक आहे की आणखी काही, हे माहित नाही

काही वेळा असे व्हिडिओ सोशल मीडियावरही दिसतात, जे पाहून नेटकऱ्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण जातं. लोकांना आश्चर्य वाटते की असे होऊ शकते का? सध्या विमानाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे लोकं भंडावून गेलीयेत. व्हायरल क्लिपमध्ये एका विमान ओव्हरब्रिजच्या वर हवेत एक ‘स्टॅच्यू’ बनून आहे. आता ही डोळ्यांची फसवणूक आहे की आणखी काही, हे माहित नाही, परंतु लोक या व्हिडिओबद्दल बोलत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महामार्गावर एक कार भरधाव वेगाने धावत आहे. त्याचवेळी गाडीत बसलेली व्यक्ती आकाशात उडणाऱ्या विमानाच्या दिशेने कॅमेरा झूम करते आणि दाखवते.
आश्चर्य म्हणजे हे विमान हवेतच पूर्णपणे थांबल्याचं दिसतंय. व्हायरल क्लिपमध्ये विमान आपल्या जागेवरूनही हटत नाही. आपण पाहू शकता की, उड्डाणपुलाखालून गाडी पुढे निघाली तरी विमान तिथेच थांबलेले दिसते.
पाहूयात हा व्हिडिओ
View this post on Instagram
हवेतल्या ‘स्टॅच्यू’ विमानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर worlds.best.rels नावाच्या अकाऊंटसोबत शेअर करण्यात आला आहे.
युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा तुमची आई तुम्हाला ऑनलाईन गेम पॉज करण्यास सांगते’. २० सप्टेंबर रोजी शेअर केलेला हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
हा व्हिडिओ 24 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर सुमारे 76 हजार लोकांनी तो लाईक केला आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतांश लोक मजेशीर पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत.