रडता रडता प्राध्यापकाने Live Show शो मध्ये फाडले Diploma चे कागद
आजपासून मला या डिप्लोमाची गरज नाही, कारण या देशात शिक्षणासाठी जागाच नाही.
काबूल युनिव्हर्सिटीच्या एका प्राध्यापकाने थेट टेलिव्हिजनवरील एका लाईव्ह कार्यक्रमात आपला डिप्लोमा फाडून टाकला आणि म्हटले की, “जर माझी आई आणि बहीण वाचू शकत नसतील तर ते सुद्धा हे शिक्षण स्वीकारत नाहीत” असं म्हणताना प्राध्यापक रडले सुद्धा. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.
अफगाणिस्तानचे पुनर्वसन मंत्री आणि निर्वासित मंत्र्यांच्या माजी धोरण सल्लागार शबनम नसीमी यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “आश्चर्यकारक दृश्य, काबूल युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी अफगाणिस्तानात लाईव्ह टीव्हीवर आपला डिप्लोमा नष्ट केला.”
“आजपासून मला या डिप्लोमाची गरज नाही, कारण या देशात शिक्षणासाठी जागाच नाही. जर माझी बहीण आणि माझी आई शिकू शकत नसतील, तर मी हे शिक्षण स्वीकारू शकत नाही” अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
नसीमी सध्या युनायटेड किंगडममध्ये कन्झर्व्हेटिव्ह फ्रेंड्स ऑफ अफगाणिस्तान या गटाचे कार्यकारी संचालक म्हणून काम करत आहेत.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानला अमेरिकन सैन्याने हाकलून लावल्यानंतर दोन दशकांनंतर अफगाणिस्तान पुन्हा ताब्यात घेतला.
Astonishing scenes as a Kabul university professor destroys his diplomas on live TV in Afghanistan —
“From today I don’t need these diplomas anymore because this country is no place for an education. If my sister & my mother can’t study, then I DON’T accept this education.” pic.twitter.com/cTZrpmAuL6
— Shabnam Nasimi (@NasimiShabnam) December 27, 2022
सत्ता काबीज केल्यानंतर लगेचच तालिबानच्या नेत्यांनी नरमाईची सत्ता स्थापन करण्याचं आश्वासन दिलं. मात्र, तसे काहीच घडले नाही आणि हळूहळू या निर्बंधांनी महिलांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर ताबा मिळवला.
गेल्या आठवड्यात, तालिबान सरकारने अफगाणिस्तानातील महिलांसाठी विद्यापीठाच्या शिक्षणावर बंदी घातली. “पुढील सूचना मिळेपर्यंत मुलींचे शिक्षण स्थगित करण्याच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे तुम्हा सर्वांना कळविण्यात आले आहे,” असे उच्च शिक्षण मंत्री नेदा मोहम्मद नदीम यांनी सर्व सरकारी आणि खासगी विद्यापीठांना जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.