Pune Metro Video : हात दाखवा अन् बस थांबवा नव्हे तर मेट्रोच थांबवा
Pune Metro : पुणे शहरात मेट्रो सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी आणखी दोन मार्गांचे लोकार्पण केले. याबाबत एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ पाहिल्यावर हात दाखवा अन् मेट्रो थांबवा, असे म्हणावे लागेल.
पुणे | 6 ऑगस्ट 2023 : राज्यातील ग्रामीण भागाची लाईफलाईन म्हणून एसटी ओळखली जाते. गाव तेथे एसटी असे ब्रीदवाक्य घेऊन एसटी सर्वत्र धावत आहे. एसटीने हात दाखवा अन् गाडी थांबवा, ही योजना अंमलात आणली होती. मग ग्रामीण भागात ही योजना चांगलीच लोकप्रिय झाली. पुणेकरांनी ही योजना राबवली आहे. पण मेट्रोत. पुणेकरांनी हात दाखवा अन् मेट्रो थांबवा, असे करुन दाखवले आहे. यासंदर्भातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओ
‘पुणे सिटी लाईफ’ या अकाउंटवरुन हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये घाईघाईने एक व्यक्ती येत असल्याचे दिसते. तो सरळ प्लॅटफॉर्मवर पोहचल्यावर मेट्रोजवळ जातो. मेट्रो निघण्याच्या तयारीत असते. मग तो ड्रायव्हरच्या केबीनकडे जाऊन दार वाजवतो.
त्यानंतर मेट्रोचे दरवाजे उघडली जातात. तो मेट्रोत बसतो. पुन्हा मेट्रो निघण्याच्या तयारी असते. थोडे अंतर जाते, तोपर्यंत आणखी एक व्यक्ती घाईने येतो. तोही मेट्रोला हात दाखवून दरवाजे उघडण्याची विनंती करतो. मग त्याच्यासाठीही मेट्रो थांबवली जाते. दारे उघडली जातात. त्यानंतर धावपळ करत तो डब्यात शिरतो अन् मेट्रो रवाना होते.
Wait… What? Only a Punekar has the confidence to knock the door of the loco pilot and ask him to stop the metro to board. ?? pic.twitter.com/5oDQEaGTB3
— Pune City Life (@PuneCityLife) August 5, 2023
काय म्हणतात युजर
मेट्रोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने तर म्हटले आहे की फक्त हात दाखवून मेट्रोच थांबवली हे नशिब, नाहीतर पुणेकर तर तो त्याने राईडसुद्धा मागितली असती, दुसऱ्या एका व्यक्तीने कॉमेंटमध्ये म्हटले आहे की, पुणेकर भविष्यात हात दाखवून विमानसुद्धा थांबवून दाखवतील…आणखी एकाने म्हटले आहे की, पुणेकर बुलेट ट्रेनलासुद्धा हात दाखवून थांबवेल…मग ही तर फक्त मेट्रो आहे.
हा व्हिडिओ नेमका कोणत्या स्थानकावरचा आहे. त्यासंदर्भात माहिती मिळाली नाही. परंतु रात्री उशिरा काढलेला हा व्हिडिओ आहे. ही शेवटची मेट्रो असण्याची शक्यता आहे.