Video | ऐकावं ते नवलंच ! पाऊस आला म्हणून थेट पहिल्या मजल्यावर चढला, बैलाला खाली आणण्यासाठी तारांबळ

200 किलोंचा एक बैल चक्क घराच्या पहिल्या मजल्यावर चढला आहे. बाहेर पाऊस बरसत असल्यामुळे पाण्यापासून आपले संरक्षण व्हावे म्हणून बैलाने हा कारनामा केलाय.

Video | ऐकावं ते नवलंच ! पाऊस आला म्हणून थेट पहिल्या मजल्यावर चढला, बैलाला खाली आणण्यासाठी तारांबळ
BULL VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 5:12 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर कधी थक्क करणारे व्हिडीओ व्हायरल होतात. तर कधी काही व्हिडीओ पाहून आपण पोट धरून हसायला लागतो. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ तर आपल्याला चक्रावून सोडणारा आहे. या व्हिडीओमध्ये पावासामध्ये भिजू नये म्हणून एका बैलाने वेगळंच काहीतरी केलं आहे. हा बैल थेट घराच्या पहिल्या मजल्यावर चढला आहे. (rajasthan bull climb on first floor of house funny video went viral on social media)

200 किलोंचा बैल घराच्या पहिल्या मजल्यावर चढला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा राजस्थानमधील पाली येथील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये 200 किलोंचा एक बैल चक्क घराच्या पहिल्या मजल्यावर चढला आहे. बाहेर पाऊस बरसत असल्यामुळे पाण्यापासून आपले संरक्षण व्हावे म्हणून बैलाने हा कारनामा केलाय. एवढंच नाही तर पहिल्या मजल्यावर चढून बैल गॅलरीमध्येसुद्धा आला आहे. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

रेस्क्यू करण्यासाठी घ्यावी लागली क्रेनची मदत  

घरात बैल घुसल्यामुळे लोक चांगलेच गोंधळले आहेत. बैलाला बाहेर कसं काढावं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. शेवटी येथील लोकांना पोलीस तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवावे लागले. त्यांची मदत घेऊन नंतर या बैलाला बाहेर काढण्यात आले आहे. 200 किलोच्या बैलाला घरातून बाहेर काढण्यासाठी लोकांना चक्क क्रेनचीदेखील मदत घ्यावी लागली आहे. बैलाला रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स 

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काही लोकांनी व्हिडीओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळेल. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ 3 मिनिटे आणि 42 सेकंदांचा आहे.

इतर बातम्या :

Video | जावयाला समजावण्यासाठी काठीचा वापर, सासऱ्याच्या अजब कारनाम्याचा व्हिडीओ व्हायरल

‘मम्मीसोबत प्रेमसंबंध ठेवतोस?’, आईच्या प्रियकराला अद्दल घडवण्यासाठी तरुणीचा चुकीचा मार्ग, लाखोंची खंडणी

अरेच्चा! ही कासवं तर तुरुतुरु पळतायत, जमिनीवर पळणाऱ्या कासवांचा VIDEO इंटरनेटवर तुफान व्हायरल 

(rajasthan bull climb on first floor of house funny video went viral on social media)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.