मध्य प्रदेश पोलिसांचा अजब कायदा, लांब मिशा ठेवल्या म्हणून हवालदाराचे निलंबन, सोशल मीडियावर एकच चर्चा

सध्या पोलीस दलातीलच एक अजक किस्सा चर्चेचा विषय ठरतो आहे. मध्य प्रदेशमध्ये एका पोलीस हवालदाराने मिशा ठेवल्या म्हणून त्याला निलंबित करण्यात आलंय. याआधी सूचना देऊनही मिशा कमी न केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलीय.

मध्य प्रदेश पोलिसांचा अजब कायदा, लांब मिशा ठेवल्या म्हणून हवालदाराचे निलंबन, सोशल मीडियावर एकच चर्चा
RAKESH RANA POLICE
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 8:10 AM

मुंबई : आपली दिमाखदार स्टाईल आणि पिळदार शरीरयष्टीमुळे काही पोलीस अधिकारी नेहमीच चर्चेचे विषय असतात. त्यांची यूनिक स्टाईल नेटकरी तसेच तरुणाईला चांगालीच आवडते. मात्र सध्या पोलीस दलातीलच एक अजब किस्सा चर्चेचा विषय ठरतो आहे. मध्य प्रदेशमध्ये एका पोलीस हवालदाराने मिशा ठेवल्या म्हणून त्याला निलंबित करण्यात आलंय. याआधी सूचना देऊनही मिशा कमी न केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. पोलिसांच्या या कारवाईची सध्या सोशल मीडयावर एकच चर्चा होत आहे.

पोलीस म्हणतात विचित्र मिशा राखल्या 

निलंबित पोलीस हवालदाराचे नाव राकेश राणा असे आहे. ते विशेष पोलीस महासंचालकांच्या वाहनाचे चालक होते. राकेश राणा यांनी चांगल्याच स्टाईलीश मिसा ठेवलेल्या आहेत. राकेश कर्तव्यावर असलेल्या पोलीस विभागाने त्यांचे राहणीमान, त्यांची स्टाईल या सर्व गोष्टींची पाहणी केली. पाहणीदरम्यान राकेश यांनी अत्यंत विचित्र प्रकारे मिशा राखल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलीस दलाने त्यांना मिशा कापून त्या व्यवस्थित करण्याचा सल्ला दिला.

राकेश राणा निलंबित 

मात्र वरिष्ठांकडून सूचना मिळूनदेखील पोलीस हवालदार राकेश राणा यांनी जिद्द सोडली नाही. काहीही झालं तरी मिशा कापणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत राणा यांच्यावर कारवाई करण्यात आली. राणा यांना निलंबित करण्यात आले. तसेच नियमांची अवहेलना केल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम पडतो, असे निरीक्षण पोलीस प्रशासनाने नोंदवले. राणा यांना शासनाकडून दिला जाणारा जीवन निर्वाह भत्ता मिळणार आहे.

राकेश राणा यांची एकच चर्चा 

दरम्यान, राकेश राणा यांच्या मिशांची स्टाईल सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडयावर त्यांचा आणि त्यांच्या मिशांचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच मध्य प्रदेश पोलिसांवर टीका केली जात आहे.

इतर बातम्या :

Airplane hits bird | पक्षी विमानाला धडकला, आवाज एका ब्लास्टसारखा झाला आणि सगळेच प्रवासी धास्तावले!

उंदराला पकडणं मांजरीला होत नाही शक्य, काय घडतं शेवटी? पूर्ण पाहा हा Viral Video

इतर तरुणांची नजर आपल्या प्रेयसीवर पडू नये म्हणून त्याने चक्क तिचे दोन दात तोडले

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.