AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ॲनिमल’चा असाही परिणाम? दीड वर्षानंतर मिटला बापलेकाच्या नात्यातील दुरावा, पहा व्हिडीओ

‘ॲनिमल’ चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. बापलेकाच्या अनोख्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचा परिणाम खऱ्या आयुष्यातही पहायला मिळाला. बापलेकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

‘ॲनिमल’चा असाही परिणाम? दीड वर्षानंतर मिटला बापलेकाच्या नात्यातील दुरावा, पहा व्हिडीओ
Ranbir and Anil in AnimalImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 11, 2023 | 1:54 PM
Share

मुंबई : 11 डिसेंबर 2023 | या वर्षातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘ॲनिमल’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. अवघ्या 10 दिवसांत संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे बरेच विक्रम मोडले आहेत. या चित्रपटातील सीन्स, डायलॉग्स आणि संगीत यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ‘ॲनिमल’मध्ये पिता-पुत्र यांच्यातील अनोखं नातं दाखवल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये रणबीर कपूरने मुलाची आणि अनिल कपूर यांनी त्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. एकीकडे ‘ॲनिमल’ या चित्रपटाची चर्चा असतानाच आता एका रिअल लाइफ बापलेकाची जोडी तुफान व्हायरल होत आहे. पापाराझी अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

‘हा आहे संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटाचा परिणाम’, असं कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्याचसोबत या व्हिडीओवर असं लिहिलंय की ‘ॲनिमल’ हा चित्रपट पाहिल्यानंतर एका वडिलांनी दीड वर्षानंतर मुलासोबतची नाराजी दूर केली. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘जर मी माझ्या वडिलांना ‘ॲनिमल’ हा चित्रपट दाखवला असता, तर त्यांनी दीड वर्षापर्यंत माझ्याशी अबोला धरला असता’, असं एकाने लिहिलं. तर ‘काकांनी संपूर्ण चित्रपट पाहिला नाही वाटतं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘तुम्हाला खरंच असं वाटतंय का, की ‘ॲनिमल’ या चित्रपटात बापलेकाच्या नात्यावर भाष्य केलंय? चित्रपटात रणबीर सतत त्याच्या वडिलांचा अपमानच करत असतो’, असंही एका युजरने लिहिलं आहे.

पहा व्हिडीओ

‘ॲनिमल’ या चित्रपटात अत्यंत श्रीमंत बिझनेसमन बलबीर सिंह (अनिल कपूर) आणि त्याचा मुलगा अर्जुन सिंह (रणबीर कपूर) यांची कथा दाखवण्यात आली आहे. तर यामध्ये बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. याशिवाय अभिनेत्री रश्मिका मंदानाने रणबीरच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात रविवारपर्यंत तब्बल 430 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

रणबीरची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टने सर्वांत आधी ‘ॲनिमल’वर प्रतिक्रिया दिली होती. प्रीमिअर शो पाहिल्यानंतर तिने सोशल मीडियावर ‘खतरनाक’ असं लिहिलं होतं. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. चित्रपटातील रणबीरच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक प्रभावित झाले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.