Rapido चा किस्सा व्हायरल, मध्यरात्री मुलीला मेसेज!
या सेवेतील मुलींच्या सुरक्षेबाबत विशेषत: रात्रीच्या वेळी अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. यासंबंधीचे एक प्रकरण सध्या चर्चेत आहे, ज्याने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.
हल्ली ऑनलाइन वाहतूक सुविधेचे युग आहे. तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे ओला, उबर किंवा रॅपिडोवरून बाईक किंवा कार बुक करा आणि ताबडतोब आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय तिथे पोहोचा. या ऑनलाइन सेवेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला गाडीसाठी भटकंती करावी लागत नाही, तर गाडी थेट तुमच्या घरी पोहोचते आणि तिथून ड्रायव्हर तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे आरामात पोहोचवतो. दिवस असो वा रात्र, ही सेवा नेहमीच उपलब्ध असते. मात्र, या सेवेतील मुलींच्या सुरक्षेबाबत विशेषत: रात्रीच्या वेळी अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. यासंबंधीचे एक प्रकरण सध्या चर्चेत आहे, ज्याने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.
एका ट्विटर युजरने रॅपिडो ड्रायव्हरवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. ड्रायव्हरच्या व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉटही त्याने शेअर केला आहे. मुलीने आपले लोकेशन व्हॉट्सॲपच्या माध्यमातून रॅपिडो ड्रायव्हरला सांगितले होते, त्यानंतर ड्रायव्हरने तिचा पाठलाग करून मेसेजमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला.
मुलीने शेअर केलेल्या रॅपिडो ड्रायव्हरच्या चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये ड्रायव्हरने लिहिले आहे, ‘हॅलो… झोप लागली का? मी फक्त तुझ्या डीपी आणि आवाजामुळे आलो, नाहीतर लोकेशन दूर होतं, मी आलो नसतो आणि हो, अजून एक गोष्ट… मी भाऊ किंवा भैय्या नाहीये.”
आता रॅपिडो केअर्सने मुलीच्या या ट्विटला प्रत्युत्तर देत ड्रायव्हरच्या या कृतीबद्दल माफी मागितली आहे. रॅपिडो केअर्सने मुलीकडे तिचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि रायडर आयडीची माहिती मागितली आहे. त्याचबरोबर या प्रकरणी आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासनही कंपनीने दिले आहे.
shared my location with a captain at @rapidobikeapp and this is what i get???? FUCK YOUR APP FUCK YOUR MEN FUCK MEN pic.twitter.com/EHLqd7lpt5
— husnpari (@behurababe) March 12, 2023
ही बाब कळल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, ‘म्हणूनच कोर्टाने या ॲप सर्व्हिसवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत’, तर दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘रॅपिडो महिलांसाठी नाही. अनोळखी व्यक्तीच्या मागे बसून तिच्यासोबत जाण्यापेक्षा मी कॅब बुक करणे पसंत करेन.