Ratan Tata | पुण्याचा शांतनु रतन टाटांचा इतका खास कसा काय झाला? त्याची गोष्ट

रतन टाटा यांनी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. यामध्ये ते एका मुलासोबत आपला वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत, पण तुम्हाला माहिती आहे की हा मुलगा कोण आहे?

Ratan Tata | पुण्याचा शांतनु रतन टाटांचा इतका खास कसा काय झाला? त्याची गोष्ट
रतन टाटा यांचा जिगरी दोस्त
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 11:27 PM

रतन टाटा (Ratan Tata) हे जगभरातले एक प्रतिष्ठीत उद्योगपती आहेत. जगभरात त्याचा आदर केला जातो लोक त्यांना आदर्श मानतात यामागील कारण म्हणजे त्यांचा असलेला साधेपणा.. 28 डिसेंबर 2021 ला त्यांचा वाढदिवस होता. त्यांनी आपला वाढदिवस सुद्धा अगदी साधेपणाने साजरा केला. सोशल मीडियावर सुद्धा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रतन टाटा आपला वाढदिवस एका मुलासोबत सेलिब्रेट करताना दिसत आहेत. रतन टाटा एका चेअरवर बसलेले दिसत आहेत आणि समोर एका टेबलवर ठेवलेला छोटा कप मधील केक कापताना दिसत आहेत. याच दरम्यान एक मुलगा रतन टाटा यांच्या जवळ येऊन उभा राहतो आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो काही वेळातच तो तिथे बसतो आणि रतन टाटा आपल्या हातांनी त्या मुलाला केक भरवतात.

कोण आहे हा मुलगा

आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला म्हटल्यावर अनेकांना प्रश्न पडला आहे की हा मुलगा आहे तरी कोण? चला तर मग आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत. व्हिडिओमध्ये जो मुलगा रतन टाटा यांच्या सोबत दिसत आहे, त्याचे नाव आहे शांतनु नायडू (Shantanu Naidu).. तो त्यांचा खासगी सचिव आहे. अगदी कमी वेळेस असे पाहायला मिळते की 85 वर्षीय उद्योगपती एखाद्या युवा व्यक्तीला आपला खाजगी सचिव म्हणून नियुक्त करतो. मात्र रतन टाटा यांनी 28 वर्षीय शांतनुला ही संधी दिली आहे.

अनेक पिढ्यांनी केले आहे टाटा यांच्यासोबत काम :

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, शांतनु त्याच्या परिवारातील पाचवी पिढी आहे जी टाटा ग्रुप सोबत काम करत आहे. शांतनुने पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. त्याने जूनियर डिझाईन इंजिनिअर म्हणून Tata Elxsi जॉईन केले होते. शांतनुची कहाणी ह्यूमन्स ऑफ बॉम्बे या फेसबूक पेजवर सुद्धा शेअर करण्यात आली होती.

वर्ष 2014मध्ये बदलले त्याचे आयुष्य

त्यांनी सांगितले की 2014 मध्ये त्याच्या आयुष्यात बदल झाले. त्याने रस्त्यावर झालेल्या एका अपघातात एका कुत्र्याला मरताना पाहिले होते, त्यानंतर त्याला खूप दुःख झाले आणि त्याने कुत्र्यांना वाचवण्यासाठी काम सुरू केले.

जेणेकरून वाचावेत कुत्र्यांचा जीव

शांतनुने रस्ते दुर्घटनेत मरणाऱ्या कुत्र्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणे सुरू केले. त्याला कुत्र्यांच्या गळ्यात घालण्यासाठी कॉलर बनवण्याची आयडिया आली, एक अशी कलर जी चमकदार असेल ज्यामुळे वाहनचालकांना दूरवरच्या अंतरावरुन सुद्धा ते दिसतील आणि त्या मुक्या जनावरांचा जीव वाचू शकेल. अशा अपघातांना ते बळी पडणार नाहीत. यासाठी त्याने Motopaws नावाचा ग्रुप सुरू केला. सगळ्यात आधी त्याने 500 कॉलर बनवले आणि अनेक मुक्या जनावरांच्या गळ्यात ते घातले, हे काम सोपे नव्हते. हे काम करण्यासाठी पैसे आणि लोकांच्या मदतीची सुद्धा तेवढीच आवश्यकता होती. मात्र त्याने अगदी धीराने सगळे सहज शक्य करून दाखवले.

रतन टाटांसोबत झाली भेट :

जे लोक रतन टाटा यांच्याबाबत थोडेफार ओळखतात ते अगदी सहजरित्या हे सांगु शकतील की त्यांचे कुत्र्यांवर विशेष प्रेम आहे. टाटा कंपनीच्या न्यूजलेटरमध्ये शांतनुचा उल्लेख केला गेला, ज्याची रतन टाटा यांनी सुद्धा प्रशंसा केली. याच कारणामुळे दोघांची भेट झाली. शांतनुने आपल्या टीमसोबत सुद्धा त्यांची भेट करून दिली, जे मुक्या जनावरांचे संरक्षण करत आहेत, त्यांच्याकडे विशेष लक्ष देत आहेत. या कामाबद्दल रतन टाटा यांनी सर्वांचे कौतुक केले..

पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले :

यानंतर शांतनु पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाला. मात्र रतन टाटा आणि त्याचे ई-मेलद्वारे संभाषण होत होते. याशिवाय त्यांच्यातली मैत्री आणखीन घट्ट होत गेली. शांतनुच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीमध्ये टाटा यांनी सहभाग घेतला होता. तेथून आल्यानंतर त्याला टाटांसोबत काम करण्याची संधी मिळाली, ही शांतनुची मेहनत होती ज्याच्यामुळे त्याला रतन टाटा यांच्या सोबत सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाली.

त्याने एक पुस्तक देखील लिहिले आहे.

शांतनूने त्याच्या आणि रतन टाटा यांच्या सोबतच्या मैत्री बद्दल एक पुस्तक सुद्धा लिहिले आहे त्या पुस्तकाचे नाव आहे ‘I Came upon a lighthouse’. हे पुस्तक लिहिण्याची आयडिया त्याला त्याच्या आईने दिली असल्याचे तो सांगतो. शांतनु रतन टाटा यांना बिझनेस आयडिया सुद्धा देत असतो.

इतर बातम्या –

‘नरकाचा दरवाजा’! तुर्कमेनिस्तानकडून बंद करण्याची तयारी सुरु, कशी झाली याची सुरुवात?

राज्यसभा खासदारांना मिळणाऱ्या पगारापासून ते त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधापर्यंत! A टू Z सगळंकाही

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.