समुद्रात प्रपोज करायला गेला, महागात पडलं!
लोक सहसा गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी रोमँटिक आणि सुंदर ठिकाणे निवडतात, काही लोकांना समुद्र हे एक रोमँटिक ठिकाण वाटते.

आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करणं ही आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. हा असा क्षण आहे जो गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आयुष्यभर विसरत नाहीत. त्यामुळे आजकाल प्रपोज करण्यासाठी लोकं खास प्लॅनिंग करतात, तो दिवस खास व्हावा यासाठी प्रयत्न करतात. भारतात अशा गोष्टी जरी क्वचितच पाहायला मिळत असल्या, तरी परदेशात मात्र त्या सर्रास दिसतात. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांत असे प्रपोजल्स अनेकदा पाहायला मिळतात. सोशल मीडियावरही त्याच्याशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.
असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस आपल्या गर्लफ्रेंडला समुद्राच्या मधोमध एका बोटीवर प्रपोज करण्याचा प्रयत्न करतो, पण यादरम्यान त्याच्यासोबत एक मजेशीर गोष्ट घडते. ही घटना फ्लोरिडा मधून समोर आलीये.
लोक सहसा गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी रोमँटिक आणि सुंदर ठिकाणे निवडतात, काही लोकांना समुद्र हे एक रोमँटिक ठिकाण वाटते.
हा मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला काही बहाण्याने समुद्रात मध्यभागी घेऊन जातो आणि मग प्रपोज करतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडसोबत समुद्रात बोटीवर टायटॅनिक पोज दिली आहे.
यानंतर तिला प्रपोज करण्यासाठी मागच्या खिशातून अंगठी काढताच ती अंगठी अचानक पाण्यात पडते. मग काय, तो माणूसही कसलाही विचार न करता ताबडतोब समुद्रात उडी मारतो आणि रिंग बॉक्स शोधतो.
या व्हिडिओला आतापर्यंत 17 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलं आहे, तर शेकडो लोकांनीही हा व्हिडिओ लाईक करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शेवटी त्या व्यक्तीला त्याची अंगठी मिळाली याचा खूप आनंद झाला, असं युजर्स म्हणत आहेत. तर काही युझर्सही हा व्हिडिओ पाहून हसत आहेत.