क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक, स्टेडियमची बाल्कनी अचानक पडली!
या स्टेडियमची क्षमता पन्नास हजार असली, तरी अधिक प्रेक्षक इथे होते. सामना सुरू झाला होता आणि प्रेक्षक खूप उड्या मारत होते.
भारतात क्रिकेटचे फॅन्स खूप आहेत. हे काय सांगायची गरज नाही. आपल्या देशातलं क्रिकेट प्रेम हे जागोजागी दिसूनच येतं. फॅन्स इतके वाढीव असतात की ते उत्साहात काय करून जातील काहीच सांगता येत नाही. एक व्हिडीओ व्हायरल होतोय. फुटबॉलची मॅच सुरु होती. उत्साहात फॅन्स नाचत होते, जोरजोरात उड्या मारत होते. इतक्या जोरात उड्या मारल्या की त्या स्टेडियम मधली बाल्कनी खाली आली. जगात फुटबॉल वरच्या प्रेमाला तोड नाही. फुटबॉल प्रेमी अति उत्साही असतात. हा व्हिडीओ बघा.
दक्षिण अमेरिकेतील चिली देशात एक घटना समोर आली आहे. फुटबॉलचा सामना चालू होता आणि पन्नास हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या स्टेडियम मध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित असेल. क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक!
उत्साही फॅन्स आपल्या टीमला चिअर करत होते. या उत्साहात ते जोरजोरात उड्या मारत होते. दरम्यान याचवेळी स्टेडियमच्या एका भागाची बाल्कनी अचानक पडली.
चिलीची राजधानी सँटियागोमध्ये ही घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, येथील कोलो कोलो स्टेडियममध्ये हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
स्टेडियमला 33 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा हा सर्व प्रकार घडला आहे.
या स्टेडियमची क्षमता पन्नास हजार असली, तरी अधिक प्रेक्षक इथे होते. सामना सुरू झाला होता आणि प्रेक्षक खूप उड्या मारत होते. तेव्हा स्टेडियमचा काही भाग पडला आणि गोंधळ उडाला.
❗️?? The roof of a grandstand at the Colo-Colo Monumental stadium in Chile collapses when it was full of fans.#colocolo #monumental #chile #news pic.twitter.com/oLwXtgxafc
— F.M NEWS (@fmnewseng) September 30, 2022
स्टेडियमच्या एका भागातील छताच्या वरची बाल्कनी पडली, त्यानंतर प्रेक्षक बाल्कनीसहित खाली आले.सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही, मात्र अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर लगेचच सामना रद्द करण्यात आला आणि खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये पाठवण्यात आलं.