शिक्षिका तर नाचल्याच पण विद्यार्थ्यांनाही सामील करून घेतलं, संमिश्र प्रतिक्रिया!
एका शिक्षिकेने डान्स केलाय त्यात तिने विद्यार्थ्यांना सुद्धा सामील करून घेतलंय.
सोशल मीडियाच्या दुनियेत रोज काही ना काही नवं ट्रेंडिंग होतंय! अलीकडेच पाकिस्तानी मुलगी आयशाने, ‘मेरे दिल कहता है…’ वर केलेला डान्स इतका व्हायरल झाला की लोकांनी याच गाण्यावर ‘इन्स्टाग्राम’वर रिल्स बनवायला सुरुवात केली. आता एका भोजपुरी गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यात एका शिक्षिकेने डान्स केलाय त्यात तिने विद्यार्थ्यांना सुद्धा सामील करून घेतलंय. यात ती एक वाक्य म्हणते आणि विद्यार्थी दुसरं वाक्य म्हणून डान्स करतात.
‘पतली कमरिया मोरी…’ असं म्हणत शिक्षिका कंबर हलवते… वर्गात उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी… हाय हाय करतात. असा हा व्हिडीओ आहे.
हा व्हिडिओ ट्विटर हँडलवरून शेअर @Gulzar_sahab आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – लहानपणी आम्हाला असे शिक्षक का मिळाले नाहीत?
बचपन में ऐसी Teacher हमें क्यों नहीं मिली ?❤️ pic.twitter.com/DCmx6USvD1
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) December 2, 2022
या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 8 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर सर्व युझर्सनी आपलं मनोगत लिहिलं आहे.
काहींनी लिहिले की, आजकाल मुले किंवा शिक्षक, प्रत्येकजण इंस्टाग्रामवर रील बनवत आहे. काहींना हा व्हिडीओ अजिबात योग्य वाटलेला नाही.