व्हिडीओ बघून अंड्याचा कुठलाही पदार्थ ऑर्डर करायची हिंमत होणार नाही, व्हायरल!
आपण नाश्त्याला अंड्याचं ऑम्लेट खाणं पसंत करतो. प्रवास करताना आपल्याला वाटतं की पटकन जे मिळेल ते घ्यावं मग आपण अंड्याचे पदार्थ मागवतो. पण अंडे फ्रेशच असतील याची शाश्वती नसते आणि आपल्याला तर माहितच आहे की खाण्याचा आरोग्यावर किती परिणाम होतो. हा व्हिडीओ बघा, बघून तुम्ही बाहेर काहीही खाताना विचार कराल.
मुंबई: बाहेर काही खायचं म्हणजे आपण खूप विचार करतो. कुठे खावं, कुठे नाही खावं, काय खावं, काय नाही खावं या सगळ्याचा प्रत्येकजण विचार करतो. आपल्याला घरून सुद्धा हेच सांगितलं जातं की थोडे जास्त पैसे गेले तरी चालतील पण चांगल्या ठिकाणी खा, कुठेही खाऊ नका. तब्येत खराब होऊ नये म्हणून या सूचना आपल्याला वारंवार दिल्या जातात. याचा अर्थ असाच होतो की काहीही खाताना ती जागा विश्वासातली हवी. असे अनेक व्हिडीओ आहेत ज्यात खाण्याची ठिकाणी अक्षरशः एक्स्पोज झालीयेत. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हॉटेलात जे स्क्रॅम्बल्ड एग बनवले जातात त्याबद्दल एक गोष्ट पुढे आलीये.
माहित नसतं की अंडे किती फ्रेश आहेत
सकाळचा नाश्ता म्हणून आपण अंड्याला पसंती देतो कारण अर्थातच अंडे प्रथिनेयुक्त असतात. ऑम्लेट म्हणा किंवा अंड्याचा कुठलाही पदार्थ म्हणा तो जरा लवकर बनवून मिळतो त्यामुळे प्रवासात सुद्धा आपल्याला वाटतं की आपण हेच खावं. मग आपण कसलाही विचार न करता स्क्रॅम्बल्ड एग, स्क्रॅम्बल्ड एग टोस्ट, स्क्रॅम्बल्ड एग सँडविच ऑर्डर करतो. खाताना ते आपल्याला छान वाटतं पण आपल्याला माहित नसतं की अंडे किती फ्रेश आहेत. आपण याचा फारसा विचार करत नाही आणि खाऊन टाकतो. हा व्हिडीओ बघा, हा व्हिडीओ बघून तुम्हाला कधीच अंड्याचा कुठलाही पदार्थ ऑर्डर करायची हिंमत होणार नाहीये.
खाणाऱ्याला शंका येणार नाही
एका इन्फ्लुएन्सरने हा व्हिडीओ बनवलाय. टिकटॉकवर एका इन्फ्लुएन्सरने हा व्हिडीओ बनवताना एका हॉटेलचा खुलासा केलाय. हा व्हिडीओ बघा. या व्हिडीओ मधला शेफ एक खूप जुनं अंड्याचं प्लास्टिकचं पॅकेट घेऊन येतोय. तो ते पॅकेट खाली ठेवतो आणि त्यावर वरून मारतो आणि ते बारीक करतो. नंतर ते मायक्रोव्हेव मध्ये ठेऊन गरम करतो म्हणजे खाणाऱ्याला शंका येणार नाही की हे अंडे जुने आहेत. मात्र, हा व्हिडिओ कोणत्या हॉटेलचा आहे, हे या इन्फ्लुएन्सरने स्पष्ट केलेले नाहीये. जेव्हा ती ब्रिटनमधील एका हॉटेलमध्ये काम करत होती तेव्हाचा हा व्हिडीओ असल्याचं ती म्हणते.