Aryan Khan drug case | रेव्ह पार्टी-ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात, चर्चा मात्र एका वेगळ्या फोटोची, नेमका प्रकार काय ?

एनसीबीने आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये तो अतिशय चिंताक्रांत असल्याचे दिसतेय. मात्र, या सर्व प्रकरणामध्ये आर्यनचा आणि एका एनसीबी अधिकाऱ्याचा एक फोटोची विशेष चर्चा होत आहे.

Aryan Khan drug case | रेव्ह पार्टी-ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात, चर्चा मात्र एका वेगळ्या फोटोची, नेमका प्रकार काय ?
ARYAN KHAN
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 8:16 PM

मुंबई : मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केलं आहे. या अटकेनंतर देशात चांगलीच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर तर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एनसीबीने आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये तो अतिशय चिंताक्रांत असल्याचे दिसतेय. मात्र, या सर्व प्रकरणामध्ये आर्यन आणि एका एनसीबी अधिकाऱ्याच्या एक फोटोची विशेष चर्चा होत आहे. या फोटोमध्ये कथित एनसीबी अधिकाऱ्याने आर्यन खानसोबत सेल्फी घेतली आहे.

आर्यनसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये आर्यनने लाल रंगाचे बटनलेस शर्ट तसेच पांढरे टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स घातलेली दिसत आहे. आर्यनसमोर उभा असलेला माणूस हा एनसीबीचा अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पकडला गेला असला तरी त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह एनसीबी अधिकाऱ्याला आवरता आलेला नाही. नाराज आणि चिंताग्रस्त असला तरी आर्यनने एनसीबी अधिकाऱ्याच्या सेल्फी कॅमेऱ्याकडे पाहिले आहे.

फोटोची सोशल मीडियावर एकच चर्चा

कथित एनसीबी अधिकाऱ्याचा आर्यन खानसोबतचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो समाजमाध्यामावर कसा आला हे समजू शकलेले नाही. मात्र हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लोक या फोटोला वेगवेगळ्या समाजमाध्यमावर शेअर करत असून मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

आर्यन खानला एका दिवसाची एनसीबी कोठडी

दरम्यान, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीच्या वकिलांनी या आरोपींची दोन दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टानं या तीन आरोपींना एक दिवसाची कोठडी सुनावलीय. आता उरर्वरित पाच आरोपींना पोलीस कोर्टात कधी हजर करतात हे पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या :

NCB Drug Raids LIVE Updates : सुनावणी सुरु, एनसीबीने 5 ऑक्टोबरपर्यंत मागितली आर्यनची कोठडी

शाहरुख खानच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, आर्यन खान…

Mumbai NCB Raid: आर्यन खानचे वकील एनसीबीच्या कार्यालयात, सरकारी वकीलही पोहोचले, आता कोर्टात काय घडणार?

(shahrukh khan son aryan khan arrested by ncb photo with ncb officer went viral on social media)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.