Ratan Tata Manager: रतन टाटांचे व्यवस्थापक शंतनू नायडूंचा व्हिडीओ व्हायरल! हसल कल्चर विषयी मांडलं मत

याच विषयावर रतन टाटांचे व्यवस्थापक शंतनू नायडू यांनी आपलं मत मांडलं. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. यात शंतनू नायडू यांनी अशा गोष्टी बोलून दाखवल्या ज्याबाबत आपण विचार करायची खरंच गरज आहे.

Ratan Tata Manager: रतन टाटांचे व्यवस्थापक शंतनू नायडूंचा व्हिडीओ व्हायरल! हसल कल्चर विषयी मांडलं मत
shantanu naidu ratan tataImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 11:51 AM

काही दिवसांपूर्वी बॉम्बे शेव्हिंग कंपनीची (Bombay Shaving Company) एक पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. या पोस्ट मध्ये त्यांनी कंपनीत काम करण्यासाठी येणाऱ्या फ्रेशर्सला तब्बल 18 तास काम करण्याचा सल्ला दिलाय. या पोस्टवरून बराच गदारोळ माजला होता. काहींचं असं म्हणणं होतं की 18 तास काम करणं शक्यच नाहीये. काहींचं असं म्हणणं होतं की 18 तास फ्रेशर असताना काम करायला हरकत नाही. याच विषयावर रतन टाटांचे व्यवस्थापक (Ratan Tata Manger) शंतनू नायडू (Shnatanu Naidu) यांनी आपलं मत मांडलं. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. यात शंतनू नायडू यांनी अशा गोष्टी बोलून दाखवल्या ज्याबाबत आपण विचार करायची खरंच गरज आहे.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या एका व्हिडीओ मध्ये एक मुलगा दिसून आला. हा मुलगा रतन टाटांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक भरवताना दिसला. यानंतर व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. मुलाचा शोध घेतला गेला. मुलगा होता रतन टाटांचा व्यवस्थापक (मॅनेजर).

“माणूस म्हणून आपली किंमत कामापेक्षाही जास्त”

याच शंतनू नायडूचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात फ्रेशर्सने 18 तासांचं काम करायला हवं असा सल्ला देणाऱ्या बॉम्बे शेव्हिंग कंपनीला त्याने चांगलंच उत्तर दिलंय. शंतनू म्हणतो, “आपण माणूस आहोत. माणूस म्हणून आपली किंमत कामापेक्षाही जास्त आहे. कामाची किंमत आपल्यापेक्षा जास्त नाही.”

“18 तास काम केल्याने माणसाची उपलब्धता आणि उत्पादकता दोन्ही कमी होऊ शकते.” शंतनू हसल कल्चरला प्रोत्साहन देत नाही. ” नातेसंबंध आणि प्रेम आपल्याला माणूस बनवतात. काम आपल्याला माणूस बनवत नाही. तरीही ज्याला झोप न घेता १८-१८ तास काम करायची इच्छा असेल त्याला ते स्वातंत्र्य आहे. पण तरुण आणि उत्साही फ्रेशर्स मध्ये अशा पद्धतीचा प्रचार करणं चांगली कल्पना नाही.” असंही तो म्हणाला.

लिंक्डइन वरचा हा व्हिडीओ बराच चर्चेत आहे. यात शंतनूच्या विचारांना लोकांची चांगलीच वाह वाह मिळालीये.

शंतनू पुढे म्हणाला की, “मला असे वाटते की शेवटी, कुटुंब, नाती, प्रेम हे महत्त्वाचं आहे. या गोष्टी आपण काम करताना मागे सोडून देतो.” असं म्हणताना शंतनू “हे माझं मत आहे. असं मला वाटतं.” हे म्हणायलाही चुकत नाही.

मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.