Video | ‘घरात पोहे नाही तर भाजी बनणार,’ धवन-पृथ्वी शॉचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल
दोघे मैदानात असले की धावफलकाकडे पहायलाच नको. दोघेही दिल्ली कॅपिटल्सकडून मैदानात उतरतात. मैदानावर या दोघांचे जसे सूर जुळलेले दिसतात तशीच मैत्री मैदानाच्या बाहेरही आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा त्याचाच पुरावा म्हणावा लागेल.
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडणारा शिखर धवन तसेच पृथ्वी शॉ सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ही जोडी क्रिकेटच्या मैदानवावर तर आपला जलवा दाखवतेच. पण समाजमाध्यमांवरसुद्धा हे दोघे अनेक मजेदार कारनामे करताना दिसतात. सध्या त्यांचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी तसेच शिखर आणि पृथ्वीचे चाहेत खळखळून हसत आहेत. (shikhar dhawan and prithvi shaw dance video went viral on social media)
शिखर धवन, पृथ्वी शॉ यांचा व्हिडीओ व्हायरल
आयपीएल म्हटलं की धावा, क्रिकेटप्रेमींची उत्कंठा, चौकार, षकटकार यांची बरसात या सगळ्या गोष्टी ओघाने आल्याच. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांची जोडी तर आयपीएलमध्ये नेहमीच धमाल करताना दिसते. दोघे मैदानात असले की धावफलकाकडे पहायलाच नको. दोघेही दिल्ली कॅपिटल्सकडून मैदानात उतरतात. मैदानावर या दोघांचे जसे सूर जुळलेले दिसतात तशीच मैत्री मैदानाच्या बाहेरही आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा त्याचाच पुरावा म्हणावा लागेल.
दोघांचा अभिनय पाहून एकच चर्चा
व्हायरल होत असेलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये शिखर आणि पृथ्वी अभिनय करताना दिसत आहे. पृथ्वी शॉ आणि शिखर धनच्या दोन वेगवेगळ्या महिलांचा अभिनय करत आहे. शिखर धवन आज भाजी बनवायला नको, आपण पोहो बनवुया असे सांगताना दिसतोय. दोघांचाही अभिनय पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत.
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच काही लोकांनी या व्हिडीओला शेअरही केलं आहे.
इतर बातम्या :
Viral Video: गाढ झोपला… गाणं लागताच नाचत सुटला; या मुलाचा व्हिडीओ पाहाल तर पोटधरून हसाल
Video | तरुणाचा आजीसोबत जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
Bigg boss Marathi 3 | तृप्ती देसाई, कीर्तनकार शीवलीला पाटील ते उत्कर्ष शिंदे, बिग बॉस मराठीमधील 15 स्पर्धकांची पूर्ण यादीhttps://t.co/I1TKD9xtbc#BiggBoss | #BiggBossMarathi3 | #BiggbossMarathiseason3 |
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 19, 2021
(shikhar dhawan and prithvi shaw dance video went viral on social media)