बापरे! डायपर घातलेलं लहान मूल जेव्हा लोडेड बंदुकीसोबत खेळतं
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की डायपर घातलेले मूल कसे बंदुकीशी खेळत आहे. कधी तो शिडीखाली लपून फिल्मी स्टाईलमध्ये गोळीबार करण्याचा सराव करतो, तर कधी हवेत बंदूक फिरवू लागतो.
लहान मुलांना खूप काळजी आणि प्रेमाची गरज असते. घरात असलं तरी त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावं लागतं, कारण ते काय करतील यावर विश्वास नसतो. विशेषत: तुमच्या घरात बंदूक असेल तर ती मुलांपासून दूर ठेवणे चांगले, कारण लहान मुलांना बंदूक किती धोकादायक आहे हे माहित नसते. काही महिन्यांपूर्वीच एका 2 वर्षाच्या मुलाने खेळताना लोडेड बंदुकीने चुकून वडिलांना गोळ्या घातल्याची घटना उघडकीस आली होती. सध्या सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो खूपच आश्चर्यचकित करणारा आहे.
या व्हिडिओमध्ये मुलगा कोणावरही गोळी झाडत नसला तरी तो लोडेड बंदुकीने खेळताना नक्कीच दिसत आहे. हा योगायोग आहे की मुलाने गोळीबार केला नाही आणि इतर कोणीही तिथं उपस्थित नव्हतं.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की डायपर घातलेले मूल कसे बंदुकीशी खेळत आहे. कधी तो शिडीखाली लपून फिल्मी स्टाईलमध्ये गोळीबार करण्याचा सराव करतो, तर कधी हवेत बंदूक फिरवू लागतो. मात्र, नंतर तो घरातच जातो.
हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
NEW: Neighbors who saw a toddler in diapers wandering around a Beech Grove, Indiana, apartment complex with a loaded handgun called police. The incident was caught on building cameras. The father – who lied that he didn’t own a gun – was arrested. #inlegis https://t.co/FPpHFNi4rn pic.twitter.com/UGic373G4L
— Shannon Watts (@shannonrwatts) January 15, 2023
ही घटना अमेरिकेतील इंडियाना येथे घडली आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी या प्रकरणी मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. सुरुवातीला वडिलांनी आपल्याकडे बंदूक नसल्याचे पोलिसांना सांगितले, मात्र नंतर तपासात त्यांच्या घराच्या आत बंदूक सापडली.
मुलाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल वडिलांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. बंदुक पूर्णपणे भरलेली होती, मात्र या घटनेत मुलाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @shannonrwatts नावाच्या आयडीसह या घटनेशी संबंधित व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 2.8 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे.