या चित्रात सरडा शोधून दाखवा! ज्याला दिसेल तोच हुशार…
बरेचदा आपण इतके गोंधळून जातो की आपण विसरतो आपल्याला नेमकं शोधायचं काय आहे. उत्तर शोधताना पहिले तर तुम्ही डोक्यात ठेवा की तुम्हाला शोधायचं काय आहे. जे तुम्हाला शोधायचं आहे ती वस्तू, ती गोष्ट, तो पक्षी कसा दिसतो? त्याचा रंग काय? याबद्दल तुम्हाला माहिती आहे ना?
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच कोडे असते. आपण लहानपणी कोडी सोडवायचो, ही कोडी आपण तोंडी सोडवायचो आता हा प्रकार ऑनलाइन आलाय. ऑप्टिकल इल्युजन हा गोंधळात टाकणारा प्रकार आहे. चित्रात प्रथमदर्शनी जे दिसतं तेच सत्य असतं असं नसतं. ऑप्टिकल भ्रम हे किचकट असतं. त्याचा रोज सराव असेल तरच ते पटकन सोडवता येतं. यात अनेक प्रकार असतात. आपल्याला कधी यात एखादा नंबर शोधायचा असतो, एखादं अक्षर शोधायचं असतं. कधी लपलेला प्राणी शोधायचा असतो तर कधी लपलेला पक्षी शोधायचा असतो. ऑप्टिकल इल्युजनचे असे अनेक प्रकार आहेत. या चित्रात तुम्हाला एक सरडा शोधायचा आहे.
वरून-खाली नीट बघा
हे चित्र बघा यात पोपट आहेत. रंगीबेरंगी पोपट असणाऱ्या या फोटोत तुम्हाला एक सरडा शोधायचा आहे. सरडा शोधणं तसं अवघड आहे. अवघड का आहे? कारण हे चित्र बघताच क्षणी आपण गोंधळून जातो. तुमचा सराव असेल, तुमचं निरीक्षण चांगलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की सापडेल. हे चित्र डावीकडून उजवीकडे बघा, वरून-खाली नीट बघा. तुम्हाला या चित्रात सरडा नक्की दिसेल.
सरडा दिसलाय का?
बरेचदा आपण इतके गोंधळून जातो की आपण विसरतो आपल्याला नेमकं शोधायचं काय आहे. उत्तर शोधताना पहिले तर तुम्ही डोक्यात ठेवा की तुम्हाला शोधायचं काय आहे. जे तुम्हाला शोधायचं आहे ती वस्तू, ती गोष्ट, तो पक्षी कसा दिसतो? त्याचा रंग काय? याबद्दल तुम्हाला माहिती आहे ना? हे सगळं डोक्यात ठेऊन तुम्ही उत्तर शोधायला घ्या. विशेष म्हणजे तुम्हाला या चित्रात सरडा शोधताना लवकरात लवकर शोधयचा आहे. रंगीबेरंगी पोपट असणाऱ्या या चित्रात तुम्हाला सरडा दिसलाय का? जर तुम्हाला उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.