Video: दुबईतील बुर्ज खलिफावर झळकला शाहरुख, वाढदिवसाचं खास गिफ्ट, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
दुबईतील गगनचुंबी इमारत असलेल्या बुर्ज खलिफावरही या शाहरुखला अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने 2 नोव्हेंबरला त्याचा 56 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या जन्मदिनी देशभरातून अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चाहत्यांपासून बॉलिवूड स्टार्सपर्यंत त्याला वाढदिवसाचे मेसेज दिले, फोटो शेअर केले आणि काहींनी व्हिडिओही शेअर केले. एवढेच नाही तर दुबईतील गगनचुंबी इमारत असलेल्या बुर्ज खलिफावरही या शाहरुखला अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, सोबतच लोक त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत. (SRK Birthday 2 November Dubai burj khalifa lights up to celebrate shahrukh khan birthday Viral video)
किंग खानच्या वाढदिवसानिमित्त बुर्ज खलिफावर शाहरुखच्या फोटो आणि विद्युत रोषणाई करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. बुर्ज खलिफावर लायटिंग करुन लिहण्यात आलं की, हॅपी बर्थडे शाहरुख. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. यासोबतच एक हार्ट इमोजी देखील दिसला.व्हिडिओतील हे दृश्य खूपच विहंगम आहेत. आता बुर्ज खलिफाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हे पाहून शाहरुखचे चाहते चांगलेच खूश आहेत.
शाहरुख खानच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील तुझे देखा तो ये जाना सनम हे गाणं व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर ऐकू येतं. एमार प्रॉपर्टीजच्या संस्थापकाने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून शाहरुख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नून फॅमिलीकडून शाहरुख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’
व्हिडीओ पाहा:
Happy birthday @iamsrk from the @noon family
كل عام وأنت بخير @iamsrk من عائلة نون pic.twitter.com/TIG3zURQjk
— Mohamed Alabbar محمد العبار (@mohamed_alabbar) November 2, 2021
किंग खानच्या चाहत्यांनी त्यांच्या सुपरस्टारचा वाढदिवस खूप खास पद्धतीने साजरा केला. यावेळीही सुपरस्टारच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. शाहरुख खानचा वाढदिवस देखील खास आहे, कारण नुकताच त्याचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाला आहे. त्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.
हेही पाहा: