हिला काय सोनं लागलंय का? स्ट्रीट फूड विक्रेता 400 रुपयाला विकतोय मॅगी
आता ही मॅगी घराबाहेर पडून हॉटेल आणि ढाब्यावर पोहोचली आहे. त्याच्या चवीत ट्विस्ट आणण्यासाठी शेफ सुद्धा नवीन प्रयोग करत असतात. पण जर 12 रुपयांची मॅगी 400 रुपयाला मिळायला लागली तर? सध्या अशाच एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजला आहे.
मुंबई: मॅगी देशी नसली तरी ती प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. मॅगी लोकांना इतके आवडते की आपल्याला बहुतेक घरांमध्ये ती दिसतेच. लहान मुले असोत किंवा वृद्ध, प्रत्येकजण मोठ्या आवडीने खातो. आता ही मॅगी घराबाहेर पडून हॉटेल आणि ढाब्यावर पोहोचली आहे. त्याच्या चवीत ट्विस्ट आणण्यासाठी शेफ सुद्धा नवीन प्रयोग करत असतात. पण जर 12 रुपयांची मॅगी 400 रुपयाला मिळायला लागली तर? सध्या अशाच एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजला आहे.
व्हायरल क्लिपमध्ये एक स्ट्रीट फूड विक्रेता मॅगीची 400 रुपयांची प्लेट सर्व्ह करताना दिसत आहे. हे पाहून फूड ब्लॉगर आश्चर्यचकित झाला आहे. मग तो विचारतो – ‘400 ची मॅगी, त्यात सोनं घालतोस का?’ विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार, त्याने मटन करीमध्ये मॅगी मिसळली आहे, ज्यामुळे चव चांगली होते आणि किंमत वाढते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विक्रेता मटणासोबत मॅगी सर्व्ह करतो.
फूड ब्लॉगर हॅरी उप्पल यांनी हा व्हिडिओ @therealharryuppal आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास 65 हजार लोकांनी लाइक केले आहे. मात्र कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी धुमाकूळ घातलाय. बऱ्याच लोकांना ही किंमत पटलेलीच नाही.
View this post on Instagram
एक युजर म्हणतो, “400 रुपयांना एका महिन्याचा स्टॉक येईल.” तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘तुम्ही बीएमडब्ल्यूमध्ये बसून फीड कराल का?” आणखी एका युजरने कमेंट केली की, “यात दुसऱ्या जगातून आणलेले गुप्त मसाले आहेत काय?”