लग्नाच्या पहिल्याच रात्री नातेवाईक खोलीत, व्हिडीओमध्ये बघा नवरदेवाची reaction!
लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेवाची खोली चांगलीच सजवलेली दिसते.
आजकाल लग्नसराईचा मोसम सुरू असून रोज काही ना काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नात आश्चर्यकारक किंवा धक्कादायक अशा अनेक घटना घडतात. मग ती नवरदेवाची एन्ट्री असो किंवा स्टेजवर नाचणारी नवरी.लग्नात प्रत्येकच गोष्टीची छान मजा घेतली जाते. कुणी जयमालाच्या काळातल्या गमतीजमतीचा व्हिडिओ पोस्ट करतं, कुणी पंडितजींसोबत एखादा प्रसंग घडला असेल मजेशीर तर तो पोस्ट करतं. पण आजपर्यंत तुम्ही इतका हटके व्हिडीओ कधीच पाहिला नसेल. कारण हा व्हिडीओ आहे लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ. या दिवशी नातेवाईक काय करतात हे या व्हिडीओ मध्ये दिसून येतंय.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नानंतर नवरदेव आपल्या नवरीला सासरी घेऊन येतो. नवरदेवाच्या घरच्यांना नववधूला सरप्राइज द्यायचं होतं. हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा सरप्राईजच देईल.
लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेवाची खोली चांगलीच सजवलेली दिसते. नवरदेव नवरीला घेऊन खोलीत शिरला, तेव्हा तो तयारी पाहून आश्चर्यचकित झाला.
खोली चांगलीच सजवली होती आणि हे सर्व पाहून वधू-वरांना खूप आनंद झाला होता. सर्वात मजेशीर गोष्ट घडली जेव्हा लग्नाच्या रात्री कुटुंबातील सर्व सदस्य अचानक खोलीत आले.
कुटुंबातील सदस्य पलंगावर बसलेल्या नववधूसमोर आनंदाने ‘रब ने बना दी जोडी’वर नाचू लागले. तर समोर बसलेली नवरीही कुटुंबातील सदस्यांना पाहून टाळ्या वाजवत होती.
View this post on Instagram
नवरदेवाच्या चेहऱ्याकडे पाहताना असं वाटत होतं की, तो बऱ्यापैकी थकलेला आहे आणि त्याला विश्रांती घ्यायची आहे. काही सेकंदांचा व्हिडिओ पाहून लोक प्रचंड हसतायत.
हा व्हिडिओ skg_photography_official इंस्टाग्रामवर शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.